साताऱ्याच्या किल्ल्याच्या डोंगरावर दोन गणेश मंदिरे आहेत.
या डोंगराच्या उतारावरील खिंडीतला गणपती आणि नागरी वस्तीततला ढोल्या गणपती म्हणजेच ज्येष्ठराज गणपती ही दोन महत्त्वाची गणेशस्थान आहे.
शिलाहार वंशातील राजा भोज याने या गावाच्या व किल्ल्याच्या रक्षणार्थ हे गणेश मंदिर स्थापले होते.
ज्येष्ठराज गणेशाची मूर्ती अकरा फूट उंच आणि साडेसहा फूट रुंद आहे. ही मूर्ती एकसंध दगडातून बनवलेली आहे.
या गणपतीचं पोट फारच मोठे आहे एकंदरीतच ही मूर्ती प्रशस्त असल्याने तिला ढोल्या गणपती असे नाव पडले आहे.
सुमारे वीस ते पंचवीस टनाची ही अवजड मूर्ती आहे. या गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होतो. देवाची पुजा परंपरेने सहस्त्रबुद्धे यांच्याकडे आहे.
सातारा बस स्टँडवरून रिक्षाने किंवा बसने ज्येष्ठराज गणपतीला किंवा ढोल्या गणपतीला जाता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.