मुग्धा आज आँफिसमधून थोड लवकरच निघाली होती. बाहेरच वातावरण पाहुन अगोदरच तिचा थरकाप उडालेला होता..वारा सुटला होता.थोडा अंधार ही पडला होता. ढगांचा गडगडाट होत होता...कसं ही करुन पाऊस येण्याअगोदर आणि विजांच्या कडकडाट होण्याअगोदर तिला घरी पोहचायचे होते. बॉसला रिक्वेस्ट करुन ती निघाली पण काही तरी घडणार आहे हि रुखरुख तिच्या मनात होत होती..विचार करतच स्कुटी चालवत असताना एका वळणावर अचानक समोरुन एक कार येताना दिसली त्याच्या हेडलाईटचा प्रकाश तिच्या डोळयांवर पडला.. तिला काही सुचेनास झालं प्रसंगावधान दाखवून समोरील व्यक्तीने कार बाजूला घेतली पण मुग्धा एका बाजूला पडली ...ती व्यक्ती गडबडीत गाडीतून उतरली आणि तिच्या जवळ पोहचली तर मुग्धाच्या अंगावर स्कुटी पडली होती. ती बाजूला करायचा निष्फळ प्रयत्न करत होती..त्या व्यकिने पटकन स्कुटी बाजूला केली. तिने हेल्मेट घातल्यामुळे आणि थोडी घाबरल्यामुळे दोघांनीही एकमेकांना बघितलं नव्हतं...स्कुटी बाजूला करुन तो तिच्याजवळ गेला तस तिची नजर त्याच्या वर पडली आणि तेव्हाच त्यानेही तिच्या डोळयात पाहिलं. ते डोळे त्याला ओळखीचे वाटले तो पटकन मागे झाला.. मुग्धा कशीबशी उठली आणि हेल्मेट काढला ..त्याच्या मात्र डोळयात राग होता पण हदयाची धडधड ही वाढली होती..आज ४ वर्षानंतर तो तिला पाहत होता..
"अश्विन"... तिने त्याला आवाज दिला
त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं..
"मरायचं होत तर अजून गाडया होत्या. माझ्या गाडी खालीच मरायचं होत का तुम्हाला???"...अश्विन चिडून म्हणाला
त्याच तुम्हाला बोलणं तिच्या जिव्हारी लागलं... परकेपणा जाणवतं होता त्या बोलण्यात..
"सॉरी ते अचानक डोळयांवर उजेड पडला आणि काही सुचलं नाही "...मुग्धा
"थोडा डोक्यात उजेड पडला असता तर बरं झालं असतं"...डोळयात राग तसाच
"कसा आहेस?? "...मुग्धा
"तुम्ही मला विचारणार्या कोण??? "...अश्विन
त्याच्या प्रश्नावर मात्र ती निरुत्तर झाली.. ती पाठ करुन स्कुटीच्या दिशेने निघाली..
"मग किती श्रीमंत मुलगा पटवला??? "...अश्विनने ओरडून विचारलं
त्याच्या प्रश्नाने तिचे डोळे भरुन आले..ती त्याच्या दिशेने वळली.तिच्या डोळयातील पाणी पाहुन आज ही त्याच्या काळजात कळ निघाली..
अश्विन आणि मुग्धा कॉलेजमधील खास फ्रेंन्ड,टॉम अँण्ड जेरी सारखी रोज भांडण करायचे पण काही वेळाने तूझं माझं जमेना तुझ्याविना करमेना अशी अवस्था😂😂 सर्व त्यांना कुछ कुछ होता है मधले राहुल अंजली चिडवायचे....कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला अश्विन ने तिला प्रपोज केलं. तिला मात्र हे अपेक्षित नव्हतं तरी त्याचं मन दुखवू नये म्हणून ती त्याला हो बोलली असेच दिवस गेले..अश्विनने पण प्रेमापेक्षा मैत्रीला महत्त्व दिले होते म्हणून तो कधी तिला कुठल्याही बंधनात ठेवत नव्हता..
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तो तिला शोधत कँटीनमध्ये आला..तेव्हा मुग्धा तिची मैत्रीण स्वाती सोबत बोलत होती. तिला दोघांबद्दल माहित होतं...
"मुग्धा अश्विन बद्दल काय ठरवलं आहेत तू ??? "..स्वाती
"मला नाही कळतं "..मुग्धा
"काय कळतं नाही?? अग तो मनापासून प्रेम करतो तुझ्यावर आणि तूझं काय??? "..स्वाती
"मी त्याला त्या दृष्टीकोनातून पाहिलचं नाही "..मुग्धा
"मग तू होकार का दिला?? का त्याला स्वप्न दाखवले??? "..स्वाती
"मला त्याला हर्ट करायचं नव्हतं "...मुग्धा
"हर्ट करायचं नव्हतं....आता जेव्हा त्याला हे कळेल तू त्याच्यावर प्रेमच करत नाही मग कसं वाटेल त्याला ?"..स्वाती
"तो मला समजून घेईल आणि तसही डँड त्याच्यासोबत लग्नासाठी परमिशन देणार नाही. त्यानां माझ्यासाठी श्रीमंत घरचा मुलगा शोधायचा आहे"..मुग्धा बोलली पण हे सर्व अश्विनने ऐकलं होतं
"वाह वाह किती छान... मला वाटलं नव्हतं माझी जवळची मैत्रीण जिच्यावर मी जीव तोडून प्रेम करतो ती माझ्याशी असं वागेल..😢😢मला तुझी किव येते तुला माझं प्रेम कधी कळलंच नाही ह्याची.. ह्यापुढे मला तुझं तोडं ही दाखवू नको"...अश्विन भरलेल्या डोळयांनी तिला म्हणाला आणि जायला वळला... त्याला पाहुन दोघीही स्तब्ध झाल्या..
"अश्विन ऐक ना "..मुग्धाने त्याचा हात पकडला
"एक शब्द नाही आजपासून तू माझी कोण?? मी तुझा कोण?? सगळ विसरायचं "...तिचा हात झटकून तो तिथून निघतो..तो खूप हर्ट झालेला असतो कारण तिच्यावर त्याचं खूप प्रेम होत. त्या रात्री तो खूप रडतो आणि सकाळी काहीतरी विचार करुन तो त्याच्या मामाच्या घरी मुंबईला निघून जातो..त्याच्या आईवडिलांना अगोदरच मी कुठे आहे हे कोणाला सांगायच नाही अशी त्याने ताकिदच दिलेली असते..घरी मुग्धाबद्दल आईबाबा दोघांना त्या दोघांबद्दल माहित होतं कारण ह्याचा दिवस उजाडला की मुग्धा, दिवस संपला तरी मुग्धा ...🙆🏻♀️
इथे मुग्धाला फक्त तो रागवला आहे म्हणून वाईट वाटतं पण दोन दिवसानंतर तो सोबत नाही म्हणून ती सैरभैर होते. त्याच्या घरी जाते तिथे कळतं तो जॉबसाठी निघून गेला आहे.ती तशीच घरी येते आणि खाली कोसळते तिचे घरचे तिला अँडमिट करतात ..
कसला तरी धसका तिने घेतल्यामुळे तिला चक्कर आली डॉक्टरकडून कळतं..ती एकटी एकटी राहु लागते..शेवटी खूप प्रयत्नांनी मेडिसिन आणि तिच्या आईच्या सपोर्टमुळे ती ठिक होते पण त्याचे शब्द तिच्या कानात तसेच फिरत होते रोज रात्री त्याच्या आठवणीशिवाय तिला झोप येत नसे...
वर्तमानकाळ
"काय बोलला श्रीमंत मुलगा?? "..आता तिलाही राग अनावर होतो
"हो तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी श्रीमंत मुलगा हवा होता ना?? मग शोधला असशील तू एखादा श्रीमंत बॉयफ्रेंड.. मी गरीब होतो तुझ्या स्टेट्सला शोभलो नसतो" ..कुत्सितपणे तो बोलतो
"अश्विन अजिबात काही बोलायचं नाही. तू त्यादिवशी काय ऐकलं? किती ऐकलं? मला नाही माहित😡😡 हो मी बोलली होती स्वातीला डँडनां श्रीमंत मुलगा हवा आहे माझ्यासाठी ते डँडच मत होत आणि हो नव्हती मला तेव्हा तुझ्याबद्दल फिलिंग पण जेव्हा तू प्रपोज केल तेव्हा तुझ्या डोळयात माझ्याबद्दल प्रेम दिसत होतं म्हणून मी काही बोलली नाही आणि होकार दिला... त्यादिवशी जेव्हा तू निघून गेला तेव्हा तुला खरं खरं सांगणार होते पण तू माझं न ऐकता माझ्यावर आरोप लावून निघून गेला"...ती चिडून बोलते
"आरोप??? खरचं बोललो मी"...तो ही चिडतो
"काय खरं बोलला रे? तू गेल्यानंतर माझी अवस्था काय झालेली तुला माहित आहे का?? मान्य आहे मी प्रेम नाही म्हणून बोलली पण जेव्हा दोन दिवस तू दिसला नाही तेव्हा सुधरत नव्हतं मला.. तुझ्या घरी गेलेली पण तू नव्हता😢😢 घरी आल्यानंतर मला अँडमिट केल एक वर्ष डिप्रेशनमध्ये होते.. माझ्यासोबत घरातल्यांनी ही त्रास भोगला आहे..तू नव्हता ना माझ्यासाठी कुणीच?? मग का त्रास झाला मला??तू खुशाल पळून गेला पण इथे मी भोगलं आहे"...तिच्या डोळयात वेदना होत्या
"आणि मी मज्जा करत होतो का?? रडून रडून रात्री काढल्या आहेत. तूझा फोटो छातीशी कवटाळून झोपायचो. तुझं माझ्यावर प्रेम नाही माहित असूनही असं वागत होतो 😢😢 पण मनात ठरवलेल श्रीमंत व्हायचं त्यामुळे जॉबवरचा फोकस नाही हलू दिला. मेहनत घेतली आज सर्व सुखसोई माझ्याजवळ आहे पण मनाला शांती नाही तरी तूला वाटतं का मी आनंदात आहे ????"...त्याच्या डोळयात अजूनही ही तिला तिच्याबद्दल प्रेम दिसतं.
तेवढयात जोरात वीज कडकडते आणि काहीही विचार न करता मुग्धा घाबरुन त्याच्या मिठीत शिरते..त्याला पण ती पाऊस ,वीजला घाबरते माहित असल्यामुळे राग बाजूला ठेवून तो तिला घट्ट पकडतो...पाऊस पडायला सुरुवात होते पण एकमेकांच्या एवढया जवळ आल्यामुळे दोघांचाही राग,त्रास त्या पावसात विरुन जातो आणि दोघंही एकमेकांना घट्ट बिलगून रडू लागतात..
मुग्धा त्याच्यापासून दूर होते..पावसामुळे डोळयातील पाणी दिसत नव्हते पण एकमेकांच्या भावना समजण्याइतपत प्रेम दोघांमध्ये नक्कीच होते..ती त्याच्या समोर गुडघ्यावर खाली बसते...
"अश्विन ,माझं चुकलं तुझं प्रेम मला उशीरा समजलं पण तुझ्याशिवाय तुझी मुग्धा नाही राहु शकत रे..मला फक्त तू हवा आहेस..आय लव यू "...मुग्धा
अश्विन तिला खांदयाला धरुन उठवतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे पाणी पुसतो...
"आय लव यु टू मुग्धा , आय एम सॉरी खूप वाईट बोललो तुला"...तो ही कान पकडतो..
त्याचे हात खाली करुन ती त्याच्या मिठीत शिरते पण आता दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते..तो तिला दूर करुन खिशात हात घालून एक वस्तू काढतो. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते..
"मला विश्वास होता आयुष्यात कुठच्या तरी वळणावर तुझी भेट नक्की होईल म्हणून जपून ठेवली होती" ..
हि ती चैन होती जी त्याने प्रपोज केल्यानंतर त्याला तिच्या गळयात घालायची होती पण तेव्हा तिने टाळाटाळ केली होती.आज मात्र हक्काने ती पाठमोरी झाली आणि तिने स्वतःचे केस पुढे केले त्याने स्वतःच्या हाताने ती चैन तिच्या गळयात घातली..
ती त्याच्याकडे वळली आणि त्याला काही कळायच्या आत तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले..तो तर शॉक झालेला काही वेळाने तिच्याभोवतीचे पकड घट्ट करून तो ही तिच्यात गुंग झाला...पाऊसाचा ही जोर चांगलाच वाढला होता...
तुझ्या माझ्या नात्याला मिळाले नाव
तुझ्या डोळयात माझ्याच प्रेमाचा भाव
अनपेक्षित त्या वळणावर भेटताच तू
पाऊसाला ही धरणीला मिळायची लागली हुरहूर
-समाप्त