जनाकाका चौघांना घेऊन वाड्यावर येतात.वाड्यात आवश्यक ती सोय त्यांनी करून ठेवलेली असते.हिवाळ्याचे दिवस असल्याने अंथरूण पांघरूण ,गॅस शेगडी ,सिलेंडर ,वापरायचं पाणी व पिण्याचं पाणी आणि खाण्याचं काही समान ह्या सगळ्याची व्यवस्था करून ठेवलेली असते.जना काकांसोबत चौघेही वाड्यात प्रवेश करतात. वाड्याच अंगण फार मोठं असत .कोणी राहत नसल्याने गवत वाढलेलं होत.बाहेरून तो वाडा दिसायला भयंकर दिसत होता.आजूबाजूला एकही घर नव्हते. मनुष्यवस्तीची एकही खुण तिथे दिसत नव्हती .सगळीकडे अंधाराच साम्राज्य होत. पाहताच मनात धडकी भरावी अस एकूण तेथील वातावरण होत. निलेश तर मनातून प्रचंड घाबरलेला होता .इथून पळून जावं अस त्याला वाटतं होत.अमोलच्या मनात भीती नव्हती कारण त्याचा देव आणि भूत यावर विश्वास नव्हता वाड्याबद्दल ऐकलंल केवळ अंधश्रद्धा आहे असं त्याला वाटतं होत.अभयला मात्र जनाकाकांनी सांगितलेल्या वाड्याबद्दल च्या कहाणीत सत्यता वाटतं होती त्याचा विश्वास होता की चांगल्या शक्तीप्रमाणे वाईट शक्ती ही असतेच म्हणून इथे जी कोणती शक्ती असेल तिचा शोध लागायला हवा अस त्याला वाटतं.तर समीर तो वाडा पाहून हळवा होतो शेवटी त्याचा वडिलोपार्जित वाडा असतो तो त्यांच्या मूळ गावातील त्याचा हा भव्य वाडा कुठल्या तरी कारणाने कित्येक वर्षांपासून निर्मनुष्य झाला आहे याचे त्याला वाईट वाटते.वाड्याच रहस्य आता शोधूनच काढू असा निर्धार तो मनाशी करतो. वाड्याच्या ओसरीत बंगळी असते जिच्या कड्या पूर्णपणे जंगून गेलेल्या असतात. हवेच्या झुळुके ने ती बंगळी हलते तिचा करकर असा शांतता भंग करणारा आवाज येत असतो त्या आवाजाने क्षणभर सगळेच दचकून जातात. आता जनाकाका जवळच्या किल्लीने मुख्य दरवाजा उघडतात.जसा दरवाजा उघडल्या जातो तसे आतून चार पाच वटवाघूळ बाहेर पडतात. निलेश तर अक्षरशः किंचाळतो .सगळेच घाबरतात.
वाड्याची बैठक खोली शंभर माणसांची पंगत बसेल इतकी ऐसपैस होती. उजव्या हाताला स्वयंपाक घर आणि डावी कडे काही खोल्या होत्या. आतूनच वरच्या मजल्यावर जाण्याकरिता जिना होता. वरच्या मजल्यावर ही काही खोल्या होत्या. पाठीमागे अंगणात विहीर होती.आणि आणखी एक बंद खोली दिसत होती दुरूनच ती खोली खूप भयंकर दिसत होती. आतूनही वाडा भकास वाटतं होता. चौघेही वाड्याच निरीक्षण करत असतात.
समीर ला एक प्रश्न पडतो
समीर: काका हा वाडा कित्येक वर्षांपासून बंद आहे तर मग इथे वीज कशी काय सुरू आहे बिल कोण भरत.
जनाकाका: वाडा जरी बंद हाय तरी त्यावर असलेला कर अन वीजबिल हे तर भराव लागत अन मोठे मालक ह्या समद्याचे पैसे मले धाडतात मग म्या समद येळेवर भरतो. आता मुलांनो म्या काय म्हणतो ते ऐका
( चौघेही कान देऊन ऐकू लागतात.) तुम्ही चौघे बी एकत्रच राव्हा ,एकट्यान कुठं जाऊ नका अन माळी काढू नका. तुमच्यासाठी नाश्ता अन जेवण घरून घेऊन येत जाईल.
समीर : बरं ठीक आहे काका तुम्ही म्हणाल तसच करू आम्ही.
जनाकाका: आता म्या निघतो रातच्याला जेवणाचा डब्बा घेऊन येतो.
चौघेही जेवणासाठी जनाकाकांना नाही म्हणतात . थोडं फार खाण्याचं समान सोबत आणलं असत तेच खाऊ अस ते सांगतात .
समीर: काका आता तुम्ही काही येऊ नका आम्हाला फारशी भूक नाही आहे.दिवसभराच्या प्रवासाने थकायला झालं आहे ,झोपेची गरज आहे आता.
बाकी तिघे समीरच्या बोलण्याला दुजोरा देतात. उद्या सकाळी येतो म्हणून आणि काळजी घ्यायची सांगून जनाकाका निघून जातात.आता हे चौघे मित्र उतरतात.
अमोल: सम्या वाडा तर मस्त आहे रे. खूप शांत वाटते आहे इथे.उगाच ते काका घाबरवत होते. भूत आहे म्हणे वाडयात .आतापर्यंत दिसला नाही तो भूत का कोण ते .
निलेश : गप न अम्या कशाला भूत भूत करतो आहेस .इकडे भितीने हातपाय कापत आहे माझे.
अभय: शांत रहा रे तुम्ही दोघ . आधीच थकायला झालं आहे . पहिले कुठल्या खोलीत राहायचं ते ठरवू या. सम्या तू सांग कुठे झोपायचं ते .
समीर: चला वरच्या मजल्यावर जायचं का तिथे बघू .
चौघेही सगळं समान घेऊन वरच्या मजल्यावर निघतात. आधीच हिवाळा आणि वाड्यात तर हाड गोठवणारी थंडी वाजत असते. वर पोहचल्यावर एका खोलीचा दरवाजा उघडून आत जातात. लाईट ऑन करतात खोली बरीच मोठी असते. आत मोठा लाकडी दिवाण असतो. एक मोठी खिडकी असते आणि त्या खिडकीतून ती मागच्या अंगणातील बंद खोली दिसत असते. गाद्या टाकून चौघेही आपआपल्या गादीवर लोटतात. रात्रीचे जवळपास 9 :30 वाजलेले असतात. वाड्याचे वातावरण खूप भयाण वाटायला लागतं. एक विचित्र गोष्ट म्हणजे कुठलंही सजीव सृष्टी आजूबाजूला दिसत नाही. आणि वाड्याच्या मागच्यादारी असलेली ती खोली खूप भयंकर वाटत असते. इतकी शांतता की लहानश्या कुठल्याही आवाजाने दचकायला होत. एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तिथे भासत होती. वर आल्या पासून निलेश ला सारख अस वाटत होतं की कोणी तरी आपल्या वर नजर ठेवून आहे पण कोण? दिसत तर कोणीही नव्हतं. त्या चौघां व्यतिरिक्त अजून कोणीतरी तिथं होत जे समीरच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात होत. पण नेमकं कोण असेल ती व्यक्ती???
जवळच थोडं खाऊन चौघेही झोपायच्या तयारीत असतात.रात्रीचे 11 वाजलेले असतात.सगळीकडे भयाण शांतता आणि तेवढ्यात लाईट जाते संपूर्ण काळोख अश्या भयानक वातावरणात खाली काहीतरी खाडकन पडल्याचा आवाज येतो. चौघेही त्या आवाजाने दचकून उठून बसतात.मोबाईल चा टॉर्च लावतात.निलेशला तर भीतीने घाम फुटतो.
अभय: कसला आवाज आहे हा काय पडलं असेल??
अमोल:थांब मी जाऊन बघतो.
समीर: अम्या एकटा नको जाऊ आम्ही पण येतो.
चौघेही टॉर्चच्या उजेडात खाली येतात . बैठकीत शोधतात काही पडलं का पण तिथे काहीही नसतं म्हणून पुढे स्वयंपाक घरात येतात. अमोल टॉर्च घेऊन सगळ्यात समोर असतो . स्वयंपाक घरात पितळेची काही भांडी पडलेली दिसतात आणि त्या अंधारात फक्त दोन हिरवे डोळे चमकताना दिसतात.ते डोळे बघून निलेश घाबरून ओरडतो.
निलेश: भूत भूत ,वाचवा वाचवा...
अमोल : निल्या गप रहा . ते भूत वगैरे नाही काळी मांजर आहे अन तिचे ते हिरवे डोळे चमकत आहे अंधारात .
अमोल टॉर्चचा प्रकाश मांजरीवर पाडतो तेंव्हा निलेश शांत होतो. पण अंधारात ती काळी मांजर फार भयंकर दिसत असते आणि कसला तरी मासाचा तुकडा ती तोडून खात असते .प्रकाशामुळे तिचं लक्ष या चौघांकडे जात अन ती म्याव म्याव अशी गुरगुरते.अभयला तिची ती नजर खूप भेदक वाटते.
अभय: पण मांजर आली तरी कुठून सगळ्या खिडक्या अन दार तर बंद आहेत,मला खूप विचित्र वाटतंय हे सगळं
अमोल : काय अभ्या तू ,विचित्र काय वाटायचं त्यात .आधीपासूनच असेल ही मांजर कुठे तरी लपलेली आणि उंदीर पकडण्याच्या धावपळीत ही भांडी पडली असतील .
चौघांचं संभाषण सुरूच असते की लाईट येते. आणि ती काळी मांजर तिथून गायब झालेली असते.
निलेश:बघ अम्या ती मांजर गायब झाली की नाही , नक्कीच इथे काहीतरी अमानवी आहे.वरच्यामजल्यावर गेल्या पासून सारखं अस वाटतंय की आपल्या चौघांव्यतिरिक्त इथे कोणी तरी अजून आहे जो आपल्यावर नजर ठेवून आहे. विश्वास करा माझा .
समीर: हो हो निल्या शांत हो तू पहिले .माझा आहे विश्वास तुझ्यावर पण जोवर या रुद्राक्षाच्या माळी आहेत आपल्या गळयात तोवर भीती नाही.चला आता झोपू ,उद्या सकाळी बघू काय ते..
लाईट बंद करून झोपायला चौघे वर निघून जातात.आणि पुन्हा त्या अंधारात ते हिरवे डोळे चमकायला लागतात...