सिंदुरासुर मर्दिला द्विरदाननें निजविक्रमें ।
गुप्त ते क्षिति व्यक्ततेप्रति पावली करुणाक्रमें ।
दर्शनें मंगलधनें अद्य काय सिंदुरवाड की ।
नांदतो गणनाथ तो भुवि रम्य सिंदुरवाडकीं ॥ १॥

विघ्नवारणदारण प्रभु वारणानन राजतो ।
दारुणाघनिवारणोद्यत धारणागणराज तो ।
वंदिता अभिवंद्यतासुख देतसे सुरनराकी । नां०॥२॥

गौतमीतटिं उत्तरस्थित क्रोशपंचकमध्यकीं ।
क्षेत्रराजविराजितक्षिति निर्जरांप्रति वद्य की ।
तीर्थ आणिक सिद्धिदायक साम्यतेस अपार की। नां०॥३॥

घृष्णेश्वरदेवताचळ पूर्व पार्श्वपदेशभू।
सत्कमळुजा नदी तटीतही शोभमान महेशभू ।
सेवितां अषभाक् दूरग होय जेथे निवाड की।नां० ॥ ४ ॥

श्रीगणेशपुराणसम्मत बादरायण बोलिला ।
मध्वनाथ मुनीश्वरावरि सद्गुरुधन वोळला ।
पांडुरंगसमेत विश्रुत सैंहुनी करुणा की। नां० ॥५॥

श्रीविघ्नराजस्तुति- पंचरत्ने । मनोमिलाषप्रद अप्रयत्ने ।
मनोहरें लब्ध दयार्णवोचें । धरा बरी हृत्पदकीं अमोघे ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel