१.आपण समुद्राच्या काठी उभे आहोत आणि आपल्या सभोवती लाटा आलेल्या आहेत स्वप्नात पाहिल्यास- आपल्यावर अनेक संकटे येतील.
२.स्वतः जहाजात चढताना पाहिल्यास- आपल्याला प्रवास घडेल.
३.आपण समुद्रावर जात आहोत असे पाहिल्यास– धनलाभ होतो.
४.समुद्राच्या पलीकडे जातोय असे दिसल्यास- मोठा उद्योग मिळेल.
५.समुद्रात आपण पोहत आहोत असे पाहिल्यास– आपल्याला धनप्राप्ती होईल.
६.आपल्या घरापुढून नदी वाहात आहे असे पाहिल्यास- काही तरी उद्योग मिळेल आणि लोकांमध्ये मान मिळेल.
७.पाऊस पडतो आहे व नदीस पूर आला आहे असे पाहिल्यास – आपल्या जवळच्या प्रभागात भयंकर रोगाची साथ उद्भवेल.
८.वाहात असलेला प्रवाह मध्यंतरीच कोरडा झाला आहे असे पाहिल्यास- कष्टाचे निवारण होईल.
९.पाण्याचा प्रवाह शेतातून वाहतोय असे दृष्टीस पडल्यास- द्रव्यलाभ होते.
१०.निर्मळ पाण्याने भरलेली विहीर पाहिल्यास- द्रव्यलाभ होते.