२१.आपण पाणी पीत आहोत असे पाहिल्यास– आयुष्यात दुःख येईल शिवाय मनाट असलेली कार्य सिद्धीला जाणार नाहीत. व्यापा-यांना व्यापारामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. ग्रहांची दुर्दशा असेल तर या व्यक्तीस कारागृहवास ही घडण्याची शक्यता असते.
२२.आपण पाण्याची चूळ भरून टाकली असे पाहिल्यास- काही संकट असेल ते दूर होईल शिवाय दुखणे बरे होईल.
२३.आपले डोके पाण्यात बुडवून पोहताना पाहिल्यास- व्यापारात नुकसान होण्याचे संभव असते, कष्टप्राप्ती होते, व नातेवाइकांबद्दल वाईट बातमी बातमी ऐकण्यात येईल.
२४.स्वप्नात संथ पाण्याचा तलाव पाहिल्यास- मानसिक तृप्ती प्राप्त होते.
२५.वाहत्या पाण्याकडे एकटक पाहात असल्याचा भास झाल्यास- अकल्पित धनप्राप्ती होते.
२६.पाण्यावर आनंदाने पोहताना दिसल्यास- मित्रांच्या संगतीमुळे सुख प्राप्त होते.
२७.नितळ संथ सरोवराच्या पाण्यात तराफ्यावरून किंवा नावेतून फिरत असताना पाहिल्यास- अतिशयीत कठीण कामही सुलभरीतीने पूर्ण होते.
२८. हेच सरोवराचे पाणी गढूळ दिसल्यास- मोठे दुखणे किंवा संकटे येतील.
२९.पाण्यात शेवाळ लागलेले दिसल्यास- पैसा मिळतो.
३०.स्वप्नात पिण्याकरिता कोणी एकाने आपल्याला तांब्याभर पाणी आणून दिल्यास- संतानवृद्धी होईल. हाच भरलेला तांब्या स्वप्नात पडला असे पाहिल्यास यामुळे मित्रावर संकट येईल.
३१.फुटक्या भांड्यात, वस्त्रात किंवा पिशवीत पाणी पिण्याचा भास झाल्यास- आपल्यावर संकट येईल. आपल्याच भरवश्याचे लोक केसाने गळा कापतील, आपल्या घरात चोरी होऊ शकते. ३२.पाण्याची भिंत कली आहे असे काही असंभवनीय पाहिल्यास- आपल्या कष्टाचे दिवस जवळ आले असण्याची शंका असते.
३३.दुस-याच्या हाताने पाणी पित आहोत असे पाहिल्यास- आपल्याला आयुष्यात अनेक कष्ट अधिक होतील.
३४.आपले सर्व घर पाण्याने शिंपडले गेले आहे असे दिसल्यास- काही हानी होईल असे समजावे.