१.स्‍वप्‍नामध्‍ये आकाश पाहणे नेहमीच चांगले असते.
२.स्वप्नात आकाश स्‍वच्‍छ आणि निरभ्र दिसल्‍यास- आपल्याला आपल्या क्षेत्रात श्रेष्‍ठत्‍व प्राप्‍त होऊ शकते व इच्छित कार्य सिद्धीस जाते आणि शत्रूवर विजय मिळतो, आपल्या हातातून गेलेले धन मिळेल, कोणत्याही वादविवादात यश मिळेल.
३.आकाशात निळ्या रंगाचे आभाळ आले आहे असे दिसल्यास- आपल्याला विपत्ती प्राप्‍त होऊ शकते, शिवाय रोग उद्भवतील, इतर लोकांशी शत्रुत्‍व येईल. 
४.स्‍वप्‍नांमध्‍ये आकाश निळ्याशार रंगात असेल आणि पांढरेशुभ्र ढग आले आहेत असे पाहिल्‍यास- आपल्याला अनेक विपत्ती येतील. त्‍यातून यशस्वीरीत्या बाहेर याल.
५.लाल रंगाचे किंवा सूर्यास्ताच्या वेळेचे आकाश स्‍वप्‍नात पाहिल्‍यास- रोगराई होण्याच शक्यता असते.
६.संध्‍याकाळचा संधीप्रकाश आभाळात पसरलेला दिसला असल्यास- आपल्‍या घरामध्‍ये कोणाला तरी रोगराई व व्याधी होण्‍याची लक्षणे दिसतील.
७.संधिप्रकाश व्‍यापारी लोकांच्या स्वप्नात दिसल्यास- व्यापाऱ्यांना व्‍यापारापासून नुकसान होण्‍याचा संभव आहे.
८.संधिप्रकाशाची किंवा लाल रंगाचे आभाळ असे स्वप्न अविवाहित मनुष्‍याने पाहिल्यास- त्‍याचा विवाह होईल.
९.स्वप्नामध्ये सूर्यमंडळ व चंद्रमंडळ पाहिल्यास- आपल्याला द्रव्‍यलाभ होऊन कार्यसिद्धी होण्याची शंका असते.
१०.स्वप्नामध्ये चंद्र व सूर्य निस्‍तेज दिसल्यास- आपला मृत्‍यु जवळ आला आहे असे समजावे  किंवा आपल्या आयुष्यात दुःखाचा प्रसंग येणार आहे असे समजावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel