२१.ग्रहणाचे स्वप्न गरोदर स्‍त्रीने पाहिल्यास- तिचे बाळ कीर्तिमान होईल.
२२.एखाद्या कैद्याने आपले डोके सूर्यकिरणांनी व्यापलेले बघितल्यास- कैदी बंधनात असेल तरी मुक्‍ती होते.
२३.हेच स्‍वप्‍न सामान्य माणसांना पडल्यास- तो माणूस समाजात उच्च सन्मानाला पात्र होतो.
२४.स्वप्नात चंद्रोदय होऊन शुभ्र असे चांदणे पडले असल्यास- त्या माणसाला आपल्या कार्यात सर्वानुकूलता प्राप्‍त होते.
२५.स्वप्नात चंद्र ढगाने झाकोळलेला किंवा ग्रहण लागलेले दिसल्यास- तर आपल्‍या घरातील एखाद्या स्‍त्रीस रोग उद्-भवेल किंवा चोर आपले घर लुटतील. हेच स्‍वप्‍न प्रवाशांनी पाहिल्यास- विपत्तिकारक ठरेल.
२६.एखाद्या माणसाचा चेहरा चंद्राइतका तेजस्वी दिसल्यास- त्या माणसाला धनलाभ होण्याची शक्यता असते.
२७.माणसाने पौर्णिमेचा पूर्णचंद्र पाहिल्यास- हे स्वप्न संततिदायक ठरते.
२८.स्वप्नआपले डोके चंद्रकिरणांनी वेष्टिलेले आहे असे पाहिले तर तो प्रसिद्धीस येईल. हेच स्‍वप्‍न कैद्याने पाहिले तर तो कैदेतून सुटेल.
२९.स्वप्नात नक्षत्रांचा चकचकीत प्रकाश पाहिल्‍यास- आपली अभिवृद्धी होते, हाच प्रकाश निस्तेज असा दिसल्यास- आयुष्य दु:खकारक जाते.
३०.रात्रीचे आकाश निरभ्र दिसले आई कोणतेही नक्षत्र पाहिल्यास- सधन आणि श्रीमंताना दारिद्रय येते, गरिबांचे आरोग्य बिघडते त्यामुळे रोगप्राप्‍ती होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel