२१.मधमाशा उडत असताना पाहणे म्हणजे आपल्या गरिबीला राम-राम करणे. याउलट श्रीमंतांच्या वाईट दिवसांना आमंत्रण दिल्यासारखे होते.
२२.स्वप्नात जळवा दिसल्यास- आयुष्य सौख्यकारक जाते.
२३.स्वप्नात घोरपड पाहिल्यास- आपल्या घडणाऱ्या कामात विघ्न येऊ शकते.
२४.स्वप्नात विंचू पाहणे नेहमी वाईटच, विंचवाने आपल्याला दंश केलेला दिसल्यास- आपल्याला शत्रू पुष्कळ तयार होतील. तयार झालेले शत्रू आपल्या वाईटवर टपून बसेल.
२५.स्वप्नात विंचूना आपण मारत आहोत असे पाहिल्यास- हे पाहणे म्हणजे आयुष्यातील संकटांचा नाश केल चांगले. आपण विंचूना मारीत असता जर तो पळून गेला असे पाहिले तर वाईट. कोणाबरोबर तरी शत्रुत्व होईल् असे समजावे.
२६.स्वप्नात सर्प पाहिल्यास- नेहमीच चांगले चिन्ह आहे. हे स्वप्न संततीदायक ठरते. त्या स्वप्नात पांढ-या सर्पाला पाहिले तर फारच शुभ समजले जाते. या पांढ-या सर्पाने उजव्या हाताला, दंडाला, भुजेला दंश केलेला पाहिल्यास किमान दहा दिवसांनी धन,द्रव्य, मिळेल असे.
२७.स्वप्नामध्ये लाल, हिरव्या रंगाचे सर्प पाहिल्यास- आपला धननाश निश्चित आहे. उदकामध्ये उभे असता विंचू, सर्प यांनी दंश केला असे पाहिले तर विजय, पुत्र, धन यांची प्राप्ती होते.
२८.स्वप्नात सर्प आपल्या घरामध्ये येतोय असे पाहिल्यास- आपले कुणाबरोबर तरी भांडण होईल आणि त्यातुन विरोध उत्पन्न होऊ शकतो.
२९.स्वप्नामध्ये सर्प विळखा घालून निपचित पडला आहे असे पाहिल्यास- अती दु:ख येते.
३०.निपचित पडलेल्या सर्पाला आपण किंवा इतर कुणी ठार मारलेले दिसल्यास- आपला शत्रूवर विजय मिळेल.