३१.आपण स्वप्नात मासे, बेडूक असे काही प्राणी पाहिल्यास- नेहमीच चांगले संकेत मिळतात.
३२.आपण कुजलेले मासे पाहिल्यास- आपल्याला किंवा आपल्या घरात कुणालातरी रोगराई येईल.
३३.आपण मासे पकडत आहोत पाहिल्यास- आपल्याला द्रव्यलाभ आणि धनलाभ होतो. ३४.तलावात किवा पाण्यात मासे आनंदाने पोहताना दिसल्यास- आपले दिवस आनंदात दिवस जातील.
३५.आपल्या स्वप्नात कासव पाहिल्यास- आपल्या नशिबात अती श्रम शिवाय कामासाठी बाहेर जाने असू शकते, यामुळे यशप्राप्ती आणि धनप्राप्ती होईल.
३६.स्वप्नात मगर, सुसर पाहणे अशुभ समजले जाते. हीच मगर किंवा सुसर आपल्याला धरून नेत आहे असे दिसल्यास- अतिशय शुभ मानले जाते.
३७.आपल्या स्वप्नात निरूपद्रवी जंतू दिसल्यास- आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सौख्य लाभते.
३८.स्वप्नामध्ये क्रूर उपद्रवी जीवजंतू दिसल्यास- आपल्याला आणि आपल्या आप्तेष्टांना कष्टप्राप्ती होईल.
३९.स्वप्नामध्ये मुंगूस पाहणे नेहमीच चांगले असते. मुंगूस सर्पाला मारत आहे किंवा त्यांची भांडण होत आहेत हे सगळे दिसल्यास- आपण आपल्या शत्रूचा पराभव करू शकतो. शिवाय शत्रू नाश होईल.
४०.स्वप्नात उंदरांना पाहणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण. उंदीर घरात धान्यची पोती किंवा काही साहित्य पोखरत आहेत हे द्रव्यनाश सुचवते.
४१.स्वप्नात उंदीर आपल्यला चावल्याचे दिसले किंवा आपल्या मागे लागलेले पाहिल्यास- आपल्याला रोगराई येईल, शिवाय आपल्यावर संकट येऊ शकते.
४२.स्वप्नात उंदीर घरामध्ये फिरतोय असे दिसल्यास- आपलं वाईट करण्याच्या हेतूने कुणी परकी किंवा आप्तेष्ट आपल्याशी मैत्री करतील.
४३.आपल्या स्वप्नात ससा पाहिल्यास- आपले भाऊ-बहिण यांपैकी कुणाचीतरी भेट होईल आणि धनलाभ होईल.