१.स्‍वप्‍नात सुगंधीत, शीतल अशा वाऱ्याचा स्‍पर्श होतोय असे वाटल्यास- मनातले सगळे हेतू सिद्धीस जातील आणि सर्व लोकामध्ये मान्‍यता मिळेल.
२.आपण प्रवासात असतना असे काही स्‍वप्‍न पाहिल्‍यास- आपली मनोकामना पूर्णत्वाला जाते. शिवाय आनंदाने घरी लवकर परतता येईल. हेच स्वप्न व्‍यापा-यांना पाहिल्यास त्‍यांच्‍या व्‍यापारात विशेष नफा होईल. हे स्वप्न कुण्या शेतकऱ्यांने पाहिल्यास त्याला शेतातून विशेष धान्‍यसमृद्धी प्राप्त होईल.
३.वादळ(वावटळ) स्‍वप्‍नात आल्यास- सुरवातीला कष्‍ट होऊन शेवटी अभिवृद्धी प्राप्‍त होतील. 
४.झंझावात(मोठा वारा) भयंकर वादळ पाहिल्‍यास- जवळच्या नातेवाईकांचा नाश होईल किंवा आपल्या मार्गी रोग व कष्‍ट येतील.
५.आपण स्‍वप्‍नामध्‍ये पतंग उडवत आहोत असे पाहिल्‍यास- आपला भाग्‍योदय होईल, उद्योगाची वृद्धी होते आणि मोठा लाभ होतो, मान मिळतो.
६.बिनवा-याचा रिमझिम पाउस पडताना पाहिलयास- येणारे दिवस सुखात जातील.
७.हेच स्‍वप्‍न शेतकरी लोकांनी पाहिले तर शेतीतून लाभ होईल.
८.ढग दाटून आलेत आणि मग पाऊस पडला असे पाहिल्‍यास सर्व देशांस विपत्ती येईल, व स्‍वत:स दु:ख, रोग इत्‍यादी प्राप्‍त होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel