( टपोरी मंडळाचे चार कार्यकर्ते बाकावर बसून एका ठिकाणी बोलत असतात.)

पक्या:- काय रामू शेट आपलं टपोरी मंडळाच कामकाज नीट चाललयं ना..?

रामू:- नीट, आरे फुल टणाटन..(जल्लोषात)

तिऱ्या:- त्या परप्रांतियांच काय? लयं माना वर काढू राहिले ते.

अण्णा:- व्हयं ना. काल भरपूर गोंधळ झालता पलीकडच्या मंडईत.

पक्या:- काय राम्या? आन् तू तर म्हणला समदं टणाटन्न म्हणून...

रामू:- (जरा घाबरत) नाही ते कायं ना...

पक्या:- बाकी काही न्हायं... थेट आता action घेऊ.

तिऱ्या व अण्ण्या:- व्हयं व्हयं.

पक्या:- काय राम्या घ्यायची ना action ?

रामू:- आं.... (घाबरत) हो. घेऊ की.

अण्णा:- पण मायला हरामी, ते लोक येतेचं कशाला हिकडं..?

तिऱ्या:- आरं ही मुंबई आहे. स्वप्नांची नगरी.

पक्या:- पैसा... पैसा मायला काय तो इथूनच न्यायचायं सगळ्यांना.

तिऱ्या:- आपला माणूस दाबून आपल्यावर साला राज्य प्रत्येकालाच करायचयं.

अण्या:- नायं. आपण परप्रांतियाशी नडायचंच. काही असो.

रामू:- पण आपण मला वाटतं बोलून तोडगा निघू शकतो यावर...

पक्या:- ही बघं हरिश्चंद्राची औलाद...( सर्वजण हसतात.)

अण्या:- राम्या तू चुकून टपोरी मंडळात आला. तू ना "सत्य मी अहिंसावादी" यांच्यात हवा होतास.

तिऱ्या:- हा आपल्या टपोरी मंडळाचा लॉंग फॉर्म ऐकून इकडे आला रे....

रामू:- हाना.. म्हणे ट-टेंभा न मिरवता पो-पोप्युलर असलेली सत्य री-रितिने चालणारी संस्था. 

अण्या:- याला नको नेऊयात उद्या हाणामारीत.

तिऱ्या:- नाय तर न्यूज यायची पेपरात आपल्याच एकातल्याची धुलाईची.
(सर्वजण हसतात.)

अण्या:- उद्या प्रत्येकाला धुवायचा आं....

पक्या:- पळवूनच लावू त्यांच्या....

तिऱ्या:- चल सध्या चहा तरी घेऊन येऊ... ( सर्वजण चालले जातात.)

( हा प्रसंग संपतो.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel