नंतर मरणासन्न परिस्थितीतही, सानिकाने एका पिशवीत बांधून खिडकीची छोटीशी काच फोडून ही डायरी कशीतरी बाहेर फेकून दिली. जी नंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला झाडांजवळ खाली पडलेली आढळली. डायरीच्या पुराव्याच्या आधारे शर्ली आणि ज्युलीला तुरुंगात टाकण्यात आले. शर्ली आणि ज्युलीचा कबुली जवाब खालीलप्रमाणे नोंदवण्यात आला.

“मी शर्ली फर्नांडीस कबुल करते की सानिका देवकर या माझ्या कॉलेजच्या फ्रेंडचा मी आणि माझी सिस्टर ज्युली मिळून खून केला आहे. सानिकाला मारल्यानंतर तिची पूर्ण बॉडी आम्ही पुढले ६ दिवस खात होतो. सानिकाच्या अगोदर मी माझ्या ग्रैंडपा, ग्रेनी,मॉम आणि पॉपला ते ओल्ड झाल्यावर मारून खाल्ले आहे.आमच्याकडे तशी ट्रेडीशन आहे. ते सगळे पण वेंडीगो होते. आमची पूर्ण फैमिली वेंडीगो आहे. सानिकाला ट्रेप करायच्या आधी आम्ही ज्युलीचा हस्बेंड कार्लोस ला पण ट्रेप केले होते!. कार्लोस ला मारल्यानंतर आम्ही ज्युली माझी सरव्हंट असल्याचा नाटक केलं होतं आणि सानिकाला ट्रेप करून इथे आणून तिला मारून टाकलं.

सानिकाच्या डायरी मध्ये लिहिलेली वेंडीगोची स्टोरी आम्हीच तिला सांगितली आहे. ती रियल नाही. मार्सेलो कोस्टा म्हणजे आमचे मैटर्नल ग्रेंडपा होते आणि एक चांगले ऑफिसर होते. खर सांगायचं तर माझ्या मॉम आणि पॉप नि त्यांना ट्रेप करून खाल्लं होतं. माझी मॉम माझ्या पॉपला भेटल्यानंतर वेंडीगो बनली होती. मार्सेलो कोस्टाचं  फ्लेश मी सगळ्यात आधी टेस्ट केलं होतं तेव्हा मी 8 इयर ओल्ड होती  पण मी सांगितलेली फेक स्टोरी ऐकून सानिका खूप घाबरली आणि नंतर ती जेव्हा वुन्डेड सिचुवेशन मध्ये ती ब्लीड होत होती तेव्हा तिची किंचाळी तिचे क्राय ऐकून मजा येत होती. तिच्या बॉडीचा रोज थोडा थोडा पीस मी आणि ज्युली खात होतो. तिचे ब्रेन आणि ब्लड आम्ही किचनच्या डीप फ्रीज मध्ये ठेवले आहे.तिच्या बॉडीवर डिसेक्शन नाईफ चालवताना  तिचा स्क्रीमिंग ऐकून खूप मजा येयची. आम्हाला ह्युमन फ्लेश खायला आणि ब्लड पेयला खूप आवडते. इकडून सुटून गेले कि मी फुडे कोणाला खायचा ते आधीच डिसाइड करून ठेवला आहे.”

या सर्व कबुली जवाबाला ज्यूलीची देखील संमती होती. हा जवाब ऐकून जवाब नोंदवून घेणारे पोलीस अधिकारी अक्षरश: सुन्न झाले. सानिकाची डायरी आणि त्यांचा हा कबुली जबाब या पुराव्यांच्या आधारावर कोर्टाने त्या दोघींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel