तिला सुद्धा अनेक दिवसानंतर असा एक व्यक्ती मिळाला होता, ज्याच्या सोबत ती मोकळ्या पद्धतीने बोलत होती. गेल्या ३ आठवड्या मध्ये जेवढी माहिती त्याने गोळा केली, तेवढी सगळी माहिती त्याने अंजलीला दाखवली. अंजली सुद्धा माहिती वाचून त्याने काढलेले फोटो बघून चकित झाली होती. कारण तिच्या पेक्षा तर जास्त माहिती, मिहीरकडे होती. अंजलीने त्यांच्या वस्तीला अजून चांगल्या पद्धतीने बघितलं होत. मिहीरचा त्यांच्या वस्तीकडे बघण्याचा एक वेगळा अंदाज आणि त्याचे फोटोज हे सार काही अंजिली साठी नवीन होत.
अरे तुझ्या कडे तर सगळंच आहे. अजून काय पाहिजे संपूर्ण वस्ती तुझ्या फोटो आणि माहितीमध्ये बसली आहे. अंजलीने मिहीरला प्रश्न केला.
सगळं तर मिळाल आहे, पण एक गोष्ट अजून बाकी आहे आणि ती म्हणजे, Interview एकदा का, हा Interview मला मिळाला ना, बस झालंच मग सगळं एवढ्या महिन्याभराची माझी मेहनत चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. चल मी निघतो, माझी ट्रेन आहे आता पुन्हा भेटू... असं बोलून मिहीर तिकडून निघून गेला.
खूप दिवसा नंतर मिहीरला वेश्यावस्तीमध्ये कोणी तरी हक्कचा माणूस मिळाल्याची जाणीव झाली होती. पुढचे काही दिवस रोज अंजली आणि मिहीर भेटायचे, त्याच काम कस सुरु आहे ? या बद्दल आणि इतर गोष्टींवर सुद्धा दोघांमध्ये बोलणं व्हायचं. वस्तीमध्ये राहणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा दोघांच्या भेटीबद्दल काहीच आक्षेप घेतला नाही. तस बघायला गेलं तर आता एवढ्या दिवसानंतर सारेजण त्याला ओळखायला लागले होते. आणि यामुळेच मिहिरवर संशय घेण्यासारखं सुद्धा काहीच न्हवत. मिहीर आणि अंजली मध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. आणि हीच मैत्री त्या दोघांना खूप जवळ सुद्धा घेऊन आली होती. इथून घरी गेल्यानंतर सुद्धा अंजली आणि मिहीर मध्ये बोलणं व्हायचं. मिहीरला माहित होत कि, अंजली हि वेश्यावस्ती मध्ये राहते, आणि तिच्या सोबत असं बोलणं इतरांसाठी खूपच विचित्र आणि वेगळं असेल. पण त्याने जेवढ्या जवळ या वस्तीला बघितल होतं तेवढ्या जवळून कदाचित कोणत्या व्यक्तीने बघितलं आहे. म्हणून त्याच्या साठी हि गोष्ट खूपच साधी अशी होती. अनेक वेळा अंजली आणि मिहीर मध्ये दोघांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सुद्धा बोलणं व्हायचं. आणि इथे सुद्धा अंजली त्याच्या समोर मोकळ्या मनाने व्यक्त व्हायची. माहित नाही का पण दोघांचं असं बोलणं, दोघांचं नेहमी भेटणं हे सार काही त्या दोघांना एका वेगळ्या वळणावर घेऊन जात होत. किंबहुना मिहीरला सुद्धा अशी एक व्यक्ती मिळाली होती, जिच्या सोबत तो सर्व काही शेअर करू शकत होता, आणि अंजली साठी तर असा व्यक्ती होता, जसा चातकसाठी पाऊस.. अंजली रोज मिहीरची वाट बघत बसायची, मिहीरकडून अंजलीला त्यांच्या वस्तीच्या बाहेरच जग बघायला मिळायचं. आणि त्यापेक्षा जास्त मिहीरचा हवा हवासा वाटणार सहवास या साऱ्याची अंजलीला सवय झाली होती. याच दरम्यान मिहीरला, अंजलीच्या मदतीने Interview सुद्धा मिळाला होता. कॉलेज प्रोजेक्टसाठी लागणारी सगळी माहिती मिहीरच्या हातात होती. मिहीर काम पूर्ण झालं होत.वेश्या वस्तीची शेवटची भेट घ्यावी म्हणून मिहीर, वस्तीवर आला होता. सोबत लहान मुलांसाठी चॉकलेट्स आणि काही वस्तू सुद्धा घेऊन आला होता. लहान मुलांना चॉकलेट्स वाटून झाल्यानंतर, मिहीरने सगळ्यांचे आभार व्यक्त केले. आणि सरते शेवटी अंजलीला भेटायला तिच्या खोली वर गेला.
अंजली आज माझा शेवटचा दिवस आहे आपल्या वस्तीवर.. समोर बसलेल्या अंजलीचा हात हातात घेऊन बोलला.
आपली वस्ती ? हि वस्ती तुझी कधी पासून झाली मिहीर ? इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा फक्त शरीराची भूक भागवायला येतो. अंजलीने मिहीरला उलट प्रश्न केला.
असं का बोलतेस, मान्य आहे मी सुद्धा इथे, माझ्या कामाच्या निमिताने आलो होतो. पण नंतर हिच वस्ती माझ्या जवळची झाली. बाहेरील माणसे या वस्तीकडे कोणत्या पण नजरेने बघू दे. पण माझ्या साठी हि वस्ती खूपच खास आहे, आणि नेहमी राहील. माझ्या या कामामध्ये तू जी कोणती मला मदत केलीस. त्या साठी खरंच खूप Thank You, आणि हो एक वेळेला या वस्तीच्या माणसांचा मला विसर पडेल. पण इथे मिळालेल्या अंजलीला मी नाही विसरू शकत. तिने हि वस्ती नाही तर या वस्तीमधील अनेक पैलू दाखवले. प्रेम काय असत, याची जाणीव मला करून दिली. आणि याच गोष्टी माझ्या साठी खूप खास आहे..
मिहीरच्या या बोलण्याला अंजली पूर्णपणे भावली होती. दोघांच्या डोळ्यातून येणार अश्रू एकमेकांच्या नात्याला अजून घट्ट करत होता. अंजलीचा निरोप घेताना, मिहीरने तिच्या काढलेल्या फोटोची फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली. अंजलीने सुद्धा मिहीरला डायरी आणि वस्तीमधील लहान मुलांसोबत काढलेला फोटो दिला. दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली. आणि अंजली सोबत त्या वस्तीचा सुद्धा निरोप निहिरने घेतला.
कॉलेजच्या प्रोजेक्ट निमित्ताने, इथे वस्तीवर आलेला मिहीर आणि अचानक अंजली सोबत झालेली त्याची भेट आणि या भेटीचं प्रेमात झालेलं रूपांतर हे सार काही अगणित असं होत. दोघचं एक असं नातं ज्याला, दोघे पण काहीच नाव देऊ शकत न्हवते. किंबहुना इतर कोणीही त्याच्या या नात्याला नाव देऊ शकत न्हवते. असं अंजली आणि मिहीरच नातं हे, अंजली साठी फक्त त्या वस्ती पर्यंत मर्यादित राहील आणि मिहीर साठी त्याच्या प्रवासामधील एका वाटाड्या सारखं सोबत राहील.