यत्र यत्र पतन्मयां रेतस्तस्य महात्मनः ।

तानि रूप्यश्च हेम्नश्च क्षेत्रण्यां सन्महीपते ।। ३३ ।।

ही कथा खोटी असल्याची पुष्टी भागवत पुराणातूनच मिळते आणि स्कंद पुराण ८ अध्याय १२ मध्ये एके ठिकाणी असे लिहिले आहे की एकदा विष्णूच्या मोहिनी अवताराचे सुंदर रूप पाहून शिव मोहित झाले आणि मोहिनीला पकडण्यासाठी तिच्या मागे धावले. त्या बरोबर मोहिनीही धावत सुटली आणि धावता धावता ती विवस्त्र झाली. तेव्हा शिवाने तिला मागून पकडले आणि तिच्या मांडीवर वीर्य सांडले, पण तरीही ती पळू लागली आणि शंकर तिला पकडण्यासाठी धावतच गेला. त्याच वासनांध अवस्थेत धावत असताना शिवाचे वीर्यपतन झाले होते. ते वीर्य पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे सोन्या-चांदीची खाण बनली.  या कथेत शिवाच्या वीर्यस्खलनाविषयी लिहिले आहे आणि त्यापासून सोन्या चांदीच्या खाणीच्या उत्पत्तीचे तपशील दिले आहेत, पण सप्तऋषींनी ते वीर्य पानांवर जमा करून अंजनीच्या कानात घालून गर्भधारणा होऊन हनुमानाचा जन्म झाल्याची अनैसर्गिक घटना नमूद केलेली नाही.

अशाप्रकारे, शिवपुराणातील कथा भागवताच्या विरुद्ध आहेत त्यामुळे अशा हनुमानाच्या उत्पत्तीच्या वर्णनाला आपण निव्वळ काल्पनिक कथा मानतो म्हणूनच हि गोष्ट ऐतिहासिक सत्य आहे असे मानता येणार नाही. सप्तर्षी मंडळ हे सात तार्‍यांच्या समूहाचे नाव आहे जे आकाशात ध्रुव ताऱ्याभोवती उत्तर दिशेला भ्रमण करतात. ते काही पुरुष नाहीत जे वीर्य किंवा रज गोळा करण्यासाठी शिवा सोबत फिरले असतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel