आपण ज्या घरात राहतो त्याला वास्तू असे म्हणतात. वास्तू म्हणजे निसर्ग आणि मानव यांची सांगड घालणारा एक महत्वपूर्ण दुवा असतो. सर्व गोष्टींची उत्पत्त्ती पंचमहाभूतांपासून होते. हि पाच तत्त्व पृथ्वीवर आहेत म्हणून तर पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे.
वास्तुमध्ये या पंचमहाभूतांचे संतुलन जर साधले गेले तसेच सर्व दिशा आणि पाच तत्वांची सांगड नैसर्गिकरित्या घातली गेली तर आपल्याला सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते. त्याचबरोबर नैसर्गिक समृदधी प्राप्त होते.
घर, इमारती, व्यावसायिक स्थाने याचे बांधकाम करताना या पंचमहाभूतांची आणि अष्टदिशांची अवहेलना झालीतर अशी वस्तू सदोष बनते आणि ती वास्तू सकारात्मक ऊर्जेपासून वंचित राहते. त्यात राहणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अनेक अडचणी आणि संकटे यांचा सामना करावा लागेल.
या जगातील प्रत्येक वास्तूमध्ये पंचमहाभूतांची पंचतत्व अगोदरच असतात. अर्थात या वास्तूतील पंचतत्वांच्या ऊर्जेचं नैसर्गिक संतुलन जेव्हा साधले जाते तेव्हा त्या इमारती मध्ये उत्तम उर्जा निर्माण होते. पण जेव्हा संतुलनात अडथळे येतात तेव्हा त्या वास्तूमध्ये गंभीर स्वरूपाचे वास्तु दोष निर्माण होऊ लागतात आणि परिणामी भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात.