चौरसाकृती किंवा आयताकृती भूखंड हे सर्वोत्तम समजले जातात. भूखंड आयताच्या आकाराचा असेल तर, उत्तर दक्षिणोत्तर भाग लांबीने जास्त असावा.
भूखंडाचा कोणताही कोपरा खंडीत नसावा. कोपरा नसलेला भूखंड लाभदायक नसतो. दोन मोठ्या भूखंडाच्या मध्यभागात असलेला भूखंड विकत घेऊ नये.
ईशान्य भाग खोलगट असावा. जर भूखंडात उतार असेल तर तो नेहमी उत्तर दिशेकडे अथवा पूर्व दिशेकडेच असावा.
भूखंडाच्या मधोमध खड्डा नसावा.
भूखंडाच्या उत्तर, ईशान्य आणि पूर्व या दिशांना मोठ्या इमारती नसाव्यात. त्यामुळे सूर्यकिरण अडवले जातात. याच इमारती दक्षिण अथवा पश्चिम दिशेकडे असल्यास चांगले असते.
पश्चिम आणि दक्षिणेकडील कुंपणाच्या भिंती या नेहमी उंच असाव्यात.
जर भूखंडाच्या ईशान्येला नदी, तलाव असेल तर चांगले असते. मात्र ईशान्य भागात विद्यूत खांब, विद्यूत तारा नसाव्यात.
भूखंडाभोवती दरी, नाला, गटार किंवा खड्डा नसावा.