आवारातील रचना पुढीलप्रमाणे असावी
- मुख्य वास्तुचे बांधकाम हे भूखंडामध्ये नैऋत्येत करावे.
- उत्तर आणि पूर्वे दिशेकडे जास्त मोकळी जागा असावी.
- ईशान्य दिशेत तुळशी वृंदावन असावे.
- पोहोण्याचा तलाव, धबधबा, कारंजे, उत्तर, पूर्व अथवा ईशान्य दिशेत असावे.
- बगीचा किंवा हिरवळ, उत्तर, पूर्व अथवा ईशान्य दिशेला असावेत.
- वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झाड, विजेचा खांब, गटार, नाली, खड्डा किंवा उकिरडा नसावा.
- आऊट हाऊस, गॅरेज वगैरेंसाठी वायव्य अथवा आग्नेय दिशेत व्यवस्था करावी.
- वायव्य भागात वाहनतळ अथवा पार्कींगची व्यवस्था करावी. बेसमेंटमध्येही पार्कींगची सोय होऊ शकते.
- घराच्या छपराचा उतार ईशान्य दिशेकडे असावा. पावसाचे पाणी घरावर उत्तर, पूर्वे, ईशान्य या दिशांकडे पडणारे किंवा ओघळणारे असावे.
- बाल्कनी, व्हरांडा वगैरे सोयी उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेत असावेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.