नवीन प्लॉट, वास्तू, सदनिका विकत घेताना तसेच नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी किंवा नवीन वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी चांगला मुहूर्त पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
मुहूर्तशास्त्र हा ज्योतिषशास्त्रातील एक विभाग आहे. त्याची मदत घेऊन आपणास चांगला मुहूर्त शोधता येईल.
वास्तू ज्याच्या नावावर आहे त्याची पत्रिका पाहून हा सोपस्कार करणे योग्य आहे. शुभकार्यासाठी गुरूबल पाहणे किंवा इतर शुभ अशुभ ग्रहस्थिती पाहणे उपयुक्त ठरते.
योग्य मुहूर्तावर शुभकार्य केल्यामुळे फलप्राप्ती अशुभ होत नाही, पीडा आणि दोष यांचे हरण होते. मनामध्ये शंका कुशंका राहत नाही.
शुभमास : वैशाख, श्रावण, मार्गशीर्ष, फाल्गुन.
शुभतिथी : शुक्लपक्षातील द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा.
शुभवार : सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार
शुभनक्षत्र : रोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, पुष्य, शततारका.
अशुभ योग आणि करण टाळावेत. अधिक मास, क्षयमास, सिंहस्थ किंवा इतर सर्व अशुभ दिवस टाळावेत.
पायाभरणी, बांधकाम, वास्तुशांती, कलशपूजन, गृहप्रवेश या गोष्टी विधिपूर्वक कराव्यात. त्यायोगे शुभफळ प्राप्त होते.