ब्रह्मस्थानाला वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे. वास्तूचा मध्यबिंदू म्हणजे ब्रह्मस्थान. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मस्थान नेहमी मोकळे असायला पाहिजे. कोणतेही दालन, भिंत, खांब शौचालय, खड्डा, स्नानघर, जड वस्तू, भिंत, तुळई, अथवा वस्तू तिथे ठेवलेली नसावी. ब्रह्मस्थान स्वच्छ, प्रकाशमान, अडगळरहित, साफ, मोकळे हवे. पूर्वी घरं अशाच पद्धतीने बांधली जायची. मध्यभाग मोकळा असायचा. कुटुंबातील सर्व सदस्य या हवेशीर खुल्या मध्यभागात बसत.
ब्रह्मस्थान दोषयुक्त झाले तर गंभीर वास्तुदोष निर्माण होतो आणि अशुभ फळं मिळतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.