या सगळ्या कार्यात सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच बरोबर त्यांना महाराष्ट्र शासनाचा
'अहिल्याबाई होळकर पुरस्कार',
'सावित्रीबाई फुले पुरस्कार' हे पुरस्कार आणि थोडी बक्षीस राशीही देण्यात आली होती.
त्यांना इचलकरंजीचा प्रतिष्ठित 'फाय फाउंडेशन पुरस्कार' अश्या अनेक उल्लेखनीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
माईंना भारतीय गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते 'आनंदमयी पुरस्कार' ही मिळाला आहे.
सिंधुताई यांच्या कार्याचे राष्ट्रीय पातळीवर देखील कौतुक झाले पंजाबमधील लुधियानाच्या 'सत्पाल मित्तल नॅशनल अवार्ड' हि त्यांना देण्यात आला.
या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि कित्येक सन्मानचिन्हे देऊन सामाजिक पातळीवर अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.