जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या योगदानाने विकसित केलेली एक अंतराळातील दुर्बीण आहे. टेलीस्कोपचे नाव जेम्स ई. वेब यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जेम्स वेब १९६१ ते १९६८ पर्यंत नासाचे एक अविभाज्य घटक होते आणि त्यांनी अपोलो कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली होती. खगोल भौतिकशास्त्रातील नासाचे प्रमुख मिशन म्हणून हबल स्पेस टेलिस्कोप यशस्वी करण्याचा त्यांचा हेतू होता. २५ डिसेंबर २०२१ रोजी एरियन फ्लाइट वि.ए २५६ वर लॉन्च करण्यात आले. हे हबलपेक्षा सुधारित इन्फ्रारेड रिझोल्यूशन आणि संवेदनशीलता प्रदान करण्यासाठी डिझाइन केले गेले होते. यामुळे नेहमीपेक्षा शंभर पटीने फिकट किंवा डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तू पाहण्यासाठी आणि रेडशिफ्ट झेड २० इतके असेल तो पर्यंतच्या निरीक्षण करण्यासाठी बनवले गले आहे. खगोलशास्त्र आणि विश्वविज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये विस्तृत तपासणी व चाचणी करण्यास सक्षम असे यंत्र बनवले गले आहे. आकाशगंगेतील काही सर्वात जुने, सर्वात दूरवर घडणाऱ्या घटना, हालचाली, ताऱ्यांच्या ग्रहांच्या धडका आणि शिवाय पहिले तारे आणि पहिल्या आकाशगंगांची निर्मिती आणि संभाव्यतः राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेटचे तपशीलवार, वातावरणीय वैशिष्ट्य हे सगळे पडताळण्यायोग्य उपकरण नसणे बनवायचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel