मेरीलँडमधील नासा गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरने या टेलिस्कोपचा विकास आणि रचना चालू केली होती. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटने हा टेलिस्कोप कार्यरत ठेवला आहे. याचे मुख्य कंत्राटदार नॉर्थ्रोप ग्रमन होते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या रचना आणि विकासाला १९९६ मध्ये सुरुवात झाली. तेंव्हा हा असा काहीसा टेलिस्कोप अंतराळात प्रक्षेपित करायचे असे ठरले होते. सुरुवातीच्या काळात म्हणजे २००७ पर्यंत याची रचना आणि विकास यावर यु.एसच पाचशे दशलक्ष डॉलर इतके बजेट नियोजित केले होते. परंतु यावर संशोधन आणि विकास करताना काही प्रमुख पुनर्रचना करण्यात आल्या. याची चाचणी आणि परीक्षण करताना दरम्यान फाटलेली सनशील्ड यावरही ज्यादाचा खर्च झाला, या टेलिस्कोप साठीची पुनरावलोकन मंडळाची शिफारस करण्यात आली त्यात थोडे बजेट वाढले.

२०१९ च्या कोविड-१९ या महामारीने आर्थिक व्यवस्था डळमळीत झाली होती. अश्या अनेक समस्यांसह विलंब आणि खर्चात वाढ झाली. एरियन ५ रॉकेट आणि दुर्बिणीसह, प्रक्षेपण वाहन यांच्यातील कम्युनिकेशनमधील समस्या यांचेही द्ठले या टेलिस्कोपने पार केले. या टेलिस्कोपच्या प्रक्षेपणावर संशोधन क्षेत्रातील पुढच्या पिढीचे भविष्य पणाला लागणार होते. हे प्रोजेक्ट  शिवाय संशोधन क्षेत्रातील कार्याचा कणा ठरले असते. दुर्बिणीच्या संरचनेतील आवश्यक जटिलता, यावर मीडियाकडून बरेच ताशेरे ओढण्यात आले. बऱ्याच इतर स्तरावरील शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी त्यावर टीकास्त्र सोडले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel