असं बरेच दिवस सुरु राहिलं..एव्हाना ऑफिसात हि गोष्ट समजली कि अमित शनाया वर लाईन मारतोय.
"भावा, हा नवीन बॉस गोडसे आहे ना साला!"
"का, काय झालं रे जोशी?"
"अरे, काय झालं काय बेन्द्र्या. एकदम वाढीव माणूस आहे यार. पहिल्याच दिवशी सेटिंग लावायला सुरुवात केली. तो कसा मागे पडलाय बघ.”
"मागे? मागे कोण?"
“अरे, बेंद्रे ...तो बघ तो.. तिला कसा मस्का लावतोय. तेच पाखरू जे आपल्या आसपास उडत सुद्धा नाही ते. तीच तुझी शनाया...."
"काय सांगतोयस काय?"
"अमितला शनायाला एकदम पर्सनल काम द्यायचं आहे असं दिसतय, म्हणून बघ त्याने कशी लगट सुरु केल्ये "
"कमाल आहे...जोशी, हा पण न ...आपण किती दिवस प्रयत्न करतोय पण यानी कसा डाव साधला भेंचो...”
"हाsss...ऑफिस मध्ये शिव्या नाही....”
"बरं तू मला आधी पूर्ण स्टोरी सांग? तू काय पाहिलं? आणि काय ऐकलस?"
"अरे मी जस्ट पाहिलं तो टीव्ही आहेना?”
“टीव्ही?”
“अरे ,म्हणजे कपाळावर टकला रे...तो तिच्याशी गुलुगुलू करतोय. ती काय खाते, काय पिते, ती कुठे जाते, काय करते, कधी हगते, कधी मुतते..सगळंच”
“ शी...घाणेरड्या काही काय बोलतोस.”
"जाऊ दे भावा.... आपण गळ टाकतच राहू...काय?."
"बरं आणि तुला तिची गाडी कोण घेऊन येतो समजलं का?"
"नाही यार. ती सुमडीत येते आणि सुमडीत जाते."
"रोज संध्याकाळी सहा वाजता शनाया बाहेर पडली कि कशी येते तिची गाडी परफेक्ट?.....कधीतरी लेट होईल तर शपथ... मी तिला लिफ्ट दिली असती यार. पण साली ती सेम गाडी बरोबर वेळेत टपकते.”
“सोड रे....तो पण लाईन मध्ये असेल ”