मी ही रात रात जगायचो परिस्थिती च्या जीर्ण पत्रिका घेऊन...
कधी उशाला ठेऊन तर कधी अंधारात नेऊन...
पण कधीच रडलो नाही
कुणाला कधी जवळ घेऊन....
हळूच मनाला म्हणालो,आर आपलीच कर्म आहेत घे थोडं वाहून
मग हिम्मत करून अंधारात उठलो
ती जीर्ण पत्रिका फाडून...
आणि सुसाट धावलो रस्त्यावरून
ठेचलेली दोन पावले घेऊन...
दमलो नाही की दमणारही नाही
खांदे मजबूत ठेवून...
अरे आडवे आपली खूप आली
आपल्यालाचं मालवून..
वातीसारखा पेटून उठलो
म्हणालो जाईन हे जग उजळून...
कुठला देव आणि कुठलं काय
जाईन माणुसकी माघे पेरून...
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.