थकल्या मनाने घरी येऊन
बसतो मायेची फुंकर शोधीत...
देवघरापुढे दुःख मांडीत असतो
निपचित पडलेलं देव शोधीत....
मंद वात होऊन जळत असतो
स्मितहास्य अंधारात शोधीत....
माझ्याकडं बघून देवही हसतो
म्हणतो,का बसला दुःख शोधीत....
येड्या जन्माला एकटा आलास
का बसलास कुणाची वाट शोधीत..
तुझे रस्तेसारे मोकळे आहेत
का बसलास कुठली दिशा शोधीत..
बघ कधीतरी स्मशानात जाऊन
कुणी येतं का तेथे तुला शोधीत....
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.