फार फार पूर्वी एका देशांत एक राजा राज्य करीत होता. त्याला एक फार सुरेख मुलगी होती. ती फार लाडकी होती त्याची. तिच्यासाठी त्यानें तऱ्हेत-हेच्या वस्तू जमविल्या होत्या. तसल्या गोष्टींची त्याला फार आवड होती. सर्व तऱ्हेनें सुखी होता तो राजा. पण राजा म्हटला की त्याला काही तरी चिंता असावीच लागते. ह्या राजाला काही नाही तर जमिनीवर चालणाऱ्या एका विचित्र नावेचीच चिंता होती. त्या साठी त्याने काय काय केले... हे या कथेत रंजकपणे मांडले आहे..