जे होतं ते बऱ्यासाठी
सूचौ नगरापासून दहा मैलावर एक मोठे सरोवर होते. त्यांत अनेक बेटें होती. पूर्वे कडील बेटाला पूर्वी तुंगतिंग व पश्चिमेकडील बेटाला पश्चिमी तुंगतिंग अशी नांवें होती. दोन्हीं बेटें सरोवराच्या मध्यभागी होती. पश्चिमेकडील बेटांत कार्वोत्सान नांवाचा एक धनी जमीनदार राहात असे. त्याला एक मुलगा व एक मुलगी होती. मुलीचें नांव चियुफान्ग असे होते. त्याने आपल्या दोनही मुलांना शिक्षण देण्यासाठी एक शिक्षक नेमला होता. चियुफान्ग विद्याभ्यासांत फार हुशार निघाली.
तिने शिवण काय, कशीदा काढणे, संगीत, नृत्य वगैरे विद्या सुद्धा अवगत करून घेतल्या. मोठी झाल्यावर तिच्या लयाची काळजी तिच्या बापाला वाटू लागली. आपल्या लाडक्या मुली जोगता वर मिळावा म्हणून बापाने खूप खटपट सुरू केली. तो लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास तयार होता. पण मुली जोगताच रूपवान शीलवान व विद्वान वर मिळावा म्हणून त्याने जागोजागी दूत पाठविले.
चियुकांगचें रूप व बुद्धिमता ऐकून दूर दूरचे लोक तिच्या बापाकडे येऊ लागले. कावोनें मध्यस्थी करणाऱ्या लोकांना सांगितले की तुम्ही बराचे किती वर्णन केलेत तरी वराला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या शिवाय मी आपल्या मुलीचा हात त्याच्या हातांत द्यायला तयार होणार नाही.
काबोनें कित्येक लोकांना असें सडेतोड उत्तर देऊन परत पाठविलें. सूचौ एका जवळच्या गांवी चियेनचिंग नांवाचा एक तरुण रहात असे. तो फार गरीब होता. परंतु रूपाने फार सुंदर आणि हुशार होता. त्याचे वाड वडील पण प्रख्यात विद्वान होते. आईवडील लहानपणींच वारल्यामुळे त्याला अत्यंत कष्टानें आपला विद्याभ्यास पुरा करावा लागला.
गरिबीमुळे त्याचे लग्न होऊ शकले नाही. नशिबानें येन चुन नामक त्याच्या एका नातेवाइकानें त्याला आपल्या घरी आश्रय दिला आणि त्याला विद्याभ्यासाला जी मदत हवी होती ती दिली होती. सेन चुन व चियेन चिंग दोषे समवयस्क होते. येन वयाने थोडा मोठा होता म्हणून त्याला चियेन चिंग 'अण्णा' म्हणत असे.
बेनचे सुद्धा लग्न झाले नव्हते. त्याच्याजवळ अलोट पैसा होता. पण त्याला विद्येचा गंध बेताचाच होता व रूप देखील बेताचेच होते. मग कोण मुलगी देणार? सुंदर सुंदर कपडे घालुन तो आरशा समोर उभा राही व विचार करी माझ्या रूपावर भाळणार नाही अशी रूपावती या जगांत कोण असणार...! येन व चियेन दोघे स्वभावाने अगदी निराळे होते. पण त्यांचे परस्परांवर फार प्रेम होते. चियेन आपल्या अन्नदात्याच्या शब्दाला मान देत असे.
चियेन हुशार होता व विद्वान होता म्हणून येन त्याच्या सल्ल्याने सर्व कामें करी. येनचा यू नांवाचा नातेवाईक पश्चिमी बेटावर व्यापारासाठी गेला होता. त्याने चियुफांगच्या सौन्दर्याचे वर्णन ऐकले पूर्वी द्वीपावर आल्यावर त्याने येनच्या समोर तिखट मीठ लावून चियुकांगच्या रूपाचें वर्णन केलें. सेननें तें वर्णन ऐकून तिच्याशीच लग्न करण्याचे मनाशी ठरविलें व युला म्हणाला,
"तुम्ही पश्चिमी बेटावर जाऊन चियु फांगच्या वडिलांना भेटून हे लग्न ठरवून या. काय वाटेल तो खर्च झाला तरी चालेल. तुम्हांला मी आजपर्यंत जे कर्ज दिले आहे ते फेडण्याची सुद्धां गरज नाही. उलट मी तुम्ही मागाल तें बक्षीस तुम्हांला देईन."
"तुम्हांला वाटते तेवढे हे सो काम नाही. काबो कोणाच्या बापांवर विश्वास करीत नाही. मुलाला पाहिल्याशिवाय मुलगी देणार नाही असे सांगून त्याने कित्येकांना परत पाठविले आहे." यू म्हणाला.
“तर चला, मी येतो तुमच्याबरोबर दोघे जाऊं..!" येन म्हणाला.
यू मनांत म्हणाला "तुझ्यासारख्याला आपली मुलगी देण्यापेक्षा मुलीचा गळा दाबुन मारणे पसंत पडेल काबोला...! पण उघड एवढेच म्हणाला
"चांगल्या रूपवान मुलांना त्याने नकार दिला आहे..!"
“तर मग तुम्हीच माझ्या वतीने जाऊन लग्न ठरवून या. तुमच्या चातुर्याचीही परीक्षा आहे असे समजा. प्रयत्न करून पहा. तुम्हाला खात्रीने यश येईल." येन म्हणाला.
येनच्या उपकाराखाली दबलेला यू पश्चिमी बेटाकडे निघाला. त्याच्याबरोबर येनने आपल्या दोघां विश्वासू नोकरांना पाठविले. कावोनें येन, तोडी वर्णन ऐकून म्हटलें
"तू म्हणतोस तसा तो मुलगा विद्वान व हुशार असेल तर आपली मुलगी द्यायला मला काहीच हरकत नाही. परंतु रीतीप्रमाणे मुलाला एकदा पाहिल्याशिवाय मी शब्द कसा देऊ..! म्हणून त्याला एकदा घेऊन ये...!" पण मी सांगू का हा मुलगा म्हणजे पुस्तकांचा किडा आहे. पुस्तकें सोडून कोठे जाईल तर शपथ. या शिवाय तो फार अभिमानी आहे. मुलीच्या बापाकडे का मी जाणार...? त्यांनी पाहिजे तर याचे पाहायला, असे म्हणतो तो.” यूनें थाप दिली. "असे असेल तर मीच येतो पाहायला. इतक्या विद्वान माणासाला पाहण्यासाठी बोलावणे बरोबर होणार नाही. माझ्या मुलीला विद्वान व रूपवान मुलगा मिळाल्यावर आणखी काय पाहिजे? मी ताबडतोड लग्न ठरवून टाकीन. जावयाला पाहिजे तितका पैसा देण्याची शक्ति माझ्यांत आहे." काबो म्हणाला.
यू घाबरला. काबोनें स्वतः येऊन येनला पाहिले तर काम बिघडणार. म्हणून तो म्हणाला,
"पण तुम्हांला एवढी तसदी घेण्याची काय गरज? जावई किती मोठा असला तरी त्यापूर्वी त्याने सासऱ्याला मान दिलाच पाहिजे. मी त्याला बोलावून घेऊन येतो."
असे सांगून यूनें तेथून पाय काढला. यूनें येऊन सर्व वर्तमान सांगितले. ते ऐकून येनचे पाय गारठले. त्याने आपल्या विश्वासू नोकरांना बोलावून विचारले.
ते म्हणाले, "यू म्हणतो ते सर्व खरे आहे."
नंतर त्याने विचार करून एके दिवशी यूला बोलाविले आणि म्हणाला
"मी म्हणतो, माझा एक भाऊ आहे. तो सुंदर आहे, सुशिक्षित व विद्वान आहे. माझें नांव सांगून तुम्ही त्याला घेऊन गेलात तर काही हरकत आहे का? मुहूर्त वगैरे ठरवून मला निरोप पाठवा. ऐन वेळी मी येऊन बोहल्यावर उभा राहीन. लागल्यावर त्यांना कळले तरी हरकत नाही. कोण काय करू शकेल ?” येननें सुचविले.
“पण तुमचा भाऊ या गोष्टीला कबूल आहे का? विचारून पहा..!" यू ने शंका केली.
"कां नाही? इतके दिवस मी त्याला पोसलें तें उगीचच का? तो माझ्या शब्दा बाहेर जाणार नाही." येन म्हणाला.
त्यानंतर त्याने चियेनला बोलावून त्याला जी कामगिरी करावयाची होती ती नीट समजावून सांगितली व म्हणाला
"माझ्या उपकाराची फेड तूं या रूपाने करूं शकशील अशी माझी खात्री आहे."
चियेन म्हणाला,"तुझ्या आज्ञेप्रमाणे वागायला मी तयार आहे. प्रश्न एवढाच आहे की जे काम साधण्यासाठी आपण हा प्रयत्न करणार तेच बिघडले तर..!"
“तुला मुलीचा बाप ओळखत नाहीं. तसा तो मला देखील ओळखत नाही. जर बिंग बाहेर आले तर मध्यस्थी करणारा यू तोंडघशी पडेल.” येन म्हणाला.
चियेनला त्याने उत्तमोत्तम रेशमी बखरें दिली. चियेन जात्याच सुंदर होता. सुंदर वस्त्रे घातल्यावर त्याचे सौंदर्य जास्तच खुलन दिसू लागलें, यू त्याला घेऊन नावेत बसून पश्चिमी बेटावर गेला आणि काबोच्या घरी पोचला. चियेनचे रूप लावण्य पाहून काबो फार खूप झाला.
म्हणाला,"अगदी अनुरूप असाच वर मुलीला मिळाला आहे. मी अगदी निराश झालो होतो. पण देवानेंच जणु काही याला पाठवून दिले आहे."
काबोने मुलाच्या विद्वत्तेची परीक्षा घेण्यासाठी आपल्या मुलीच्या गुरूला बोलाविलें. चियेनने निरनिराळ्या पुस्तकांतील उतारे ऐकवून त्याला अगदी गुंगवून सोडले. तेव्हां त्याने मालकाला सांगितले की दांडगा पंडित दिसतो आहे मुलगा. काबोला तें ऐकून डोक्यावरचे ओझें कमी झाले असे वाटले, मुलीने स्वत:च्या डोळ्यांनी आपल्या होणाऱ्या पतीचे रूप पाहिले व आपल्या भाग्याचे आभार मानले.
कायो यूला म्हणाला, "खरोखरच मुलगा फार चांगला आहे. आतां ठरवा मुहूर्त वगैरे आणि पुढच्या तयारीला लागा."
काम झाल्यावर यू चियेनला घेऊन परत पूर्वा बेटावर आला. येनच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याने लयाचा मुहूर्त ठरवून मुलीकरितां साखरपुडा म्हणून उंची वस्त्रे व दागिने पाठविले. त्या काळी चीन देशाच्या त्या भागांत अशी रीत होती की मुलीची आई मुलाच्या घरी आपल्या मुलीला घेऊन जाई तेथे तिचे लम लावून देई. परंतु काबोची इच्छा होती की लग्न त्याच्या घरी व्हावे. लोकांनी येऊन त्याचे वैभव पहावे. त्याची स्तुति करावी. असा विचार करून त्याने निरोप पाठविला की लय पश्चिमी बेटावरच व्हावे, खर्चाची सर्व जबाबदारी वधूपक्षावरच राहील, निरोप आल्यावर येन म्हणाला,
"आतां कांही सुटका दिसत नाही. इच्छा असो किंवा नसो, जायें हें लागणारच.”
यू म्हणाला,"प्रसंग मोठा कठीण आहे. चियेनला सर्व लोकांनी पाहिलेले आहे. त्याच्या जागी दुसरे कोणी उभे राहल्यावर खास ओरडा होणार. मारामारी पर्यंत पाळी आली नाही तर आश्चर्य. माझं डोकेंच उडेल. तुमच्यावर जो प्रसंग ओढवेल तो देवच जाणे. लग्न देखील मोडेल."
"हे सर्व तुझ्या मूर्खपणाने झाले आहे. चियेनच्या ऐवजी मी गेलो असतो तर काय बिघडले असते..! मी आपल्या सर्व लोकांना तयार रहावयास सांगतो. सलोख्याने झाले तर ठीक, नाहीतर बळजबरीने जो कोणी डोकेंवर काढील त्याचे डोके उडालेंच समज." येन म्हणाला.
“तुमच्या दहा बीस लोकांना का तो भीक घालणार आहे. सर्व बेट त्याच्या बाजूने उभे राहात्यावर तूं व तुझे लोक काय करूं शकणार..? बळजबरीने हे काम होणार नाही...!" यूनें सल्ला दिला.
येनला पुन्हां चियेनच्या मदतीची अपेक्षा करावी लागली. त्याने बोलावून म्हटलें “पुढच्या आठवड्यांत माझे लग्न आहे. पण तूं पूर्वी गेला होतास म्हणून तुला या हि खेपेस जावे लागणार आहे. मागच्या खेपेस फक्त मुला मुलीला पाहण्याचेच काम होते. पण आतां प्रत्यक्ष लग्नाची गोष्ट आहे. तुझ्या ऐवजी मी गेलों तर ते कसे बरें चालेल?” चियेन म्हणाला.
"तें सर्व खरे आहे. पण हे पहा, त्यांनी तुला पाहिले होते. आतां जर मी तुझ्या ऐवजी गेलो तर गैरसमज होण्याचा संभव आहे. पण लय कार्य संपल्यावर तिला आपण सांगू तसे वागावेच लागेल." येन म्हणाला.
चियेनला या खेपेस सुद्धा जावेच लागले. त्याने नवरदेवाचा पोशाख केला आणि वऱ्हाडाबरोबर पश्चिमी बेटाकडे निघाला. मुलीच्या घरी त्या दिवशी नवऱ्या मुलाकरिता मोठ्या मेजवानीची तयारी केली गेली होती. ठरल्या मुहूर्तावर लग्न समारंभ संपला. मुलाबरोबर मुलीला पाठवून देण्याची वेळ आली. यूने मुलीकडेच्या मानकऱ्याना बसवले. नोकरांचाकरांना इनाम व बक्षिसें वांटली. निघण्याची सर्व तयारी झाली. तितक्यांत नावाडी धांवत येऊन म्हणाले,
“आज निवणे अशक्य आहे. मोठे वादळ सुटले आहे. या वादळांत प्रवास करणे बरोबर नाही.”
सर्वांना निराशा वाटली. परंतु गत्यंतरच नव्हते. काबोनें सर्व वऱ्हाडी मंडळींना परत बोलाविले आणि म्हणाला,
“येथेच रहा उद्या वादळ संपल्यावर पाहिजे तर निघा."
दुसऱ्या दिवशी तुफान कमी व्हायच्या ऐवजी जोरात वाहू लागले. त्यांत बरफ पडू लागलें, मुहूर्तावर निघणे शक्य झाले नाही म्हणून मुलाची राहण्याची व्यवस्था करावी लागली. एका वृद्ध गृहस्थाने येऊन सूचना केली की जें होतें तें बन्यासाठीच होते असें समजून पुढची तयारी करा. वऱ्हाडी मंडळी देखील या गोष्टीस कबूल झाली. पण चियेन व यू किंकर्तव्यविमूढ स्थितीत परस्परांची तोंड पहात उभे राहिले.
चियेनने विचार केला, "आपण या जाव्यांत स्वतःला व्यर्थ ओढवून घेतले. आतां पाय मागे घेणे देखील कठीण आहे. स्वतःचे असे कोणी जवळ नव्हतें सल्ला घ्यायला. आता पर्यंत तो तोतया वर बनला होता. पण आता प्रत्यक्ष वर होणे प्राप्त झाले होते. त्याचे मन कचरूं लागले. त्याने यूला विचारावयाचे ठरविलें. पण तो तर खूप झिंगून पडला होता.”
शेवटी त्याने स्वतः मुलीच्या वडिलांना येऊन निवेदन केलें,"घाई करण्याचे कारण नाही. हा मुहूर्त साधला नाही तर दुसरा मुहूर्त साधेल."
काबोने चकित होऊन विचारले,
"कां बरें! हा मुहूर्त टळला नाही. मग पुढे ढलण्याचे काय कारण?"
चियेनला उत्तर सुचलें नाहीं. जेवणे खाणे आटोपल्यावर एका सुंदर शयनगृहांत वरवधूच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. चियेनने वधूकडे पाहिले नाही की तिच्याशी चार शब्द बोलला देखील नाही. तो पलंगावर एका बाजूला पडून राहिला. तीन दिवस वादळ थांबले नाही. चवथ्या दिवशी वरवधूना निरोप देण्यात आला. चियेन पळत पळत येनकडे गेला व घडलेले सर्व वृत्त निवेदन केले. वृत्त ऐकून येनला राग आला व त्याने अविचाराने चियेनला बेदम बडविले. इतक्यांत काबोने पुढे येऊन विचारले. “आमच्या जोक्याला मारणारा तूं कोण उपटसुंभ्या?"
येनने वस्तुस्थिति मूर्खपणाने सांगून टाकली. त्याने यूला धरून या फसवणूकीबद्दल खूप बडविले. त्यानंतर येनच्या बाजूच्या लोकांचे कावीच्या बाजूच्या लोकांशी युद्धच सुरू झाले. सुदैवाने त्याच वेळी गांवचा न्यायाधीश पालखीत बसून तिकडून जात होता. त्याने पालखी थांबवून भांडणाचे कारण विचारले. त्याने दोघांचे भांडण ऐकून न्यायनिवाडा दिला. येननें फसवून काबोच्या मुलीशी लग्न करण्याचा घाट घातला होता. म्हणून त्याला चवाव्यावर कोरडे मारण्याची शिक्षा देण्यात आली. त्याने चियेनला देखील दोषी ठरविलें, परंतु येनच्या हातचा मार मिळाल्यामुळे त्याला शिक्षा मिळाल्याचे सांगून न्यायाधिशानें त्याला निराळी शिक्षा सांगितली नाही. नंतर न्यायाधिशानें काबोच्या मुलीचे चियेनशी झालेले लग्नच कायदेशीर आहे असा निवाडा दिला. काबोला आनंद झाला. तो आपल्या जावयाला घेऊन पश्चिमी बेटावर गेला व त्याला घर जावई करून घेतले.
चियेन व चियुफांगचा संसार सुखाचा झाला.