Hi , माझ नाव प्रतिक बाळसराफ .
मी पुणे हाउसिंग बोर्ड
येरवडा येथे राहतो. हे पेज
मधील सर्व गोष्टी भयानक
आणि सत्य वाटल्या म्हणून
माझ्या आयुष्यात
घडलेली गोष्ट आज
मी तुम्हाला सांगतोय.
ती भयानक घटना ४
वर्षापूर्वी घडली होती .
तेव्हा मी १७ वर्षाचा होतो .
मी जिथे राहतो तिथून थोड्याच
अंतरावर एक शाळा आहे .
त्या शाळेच कट्टा म्हणजे
आमचा रोजच भेटण्याचा स्पॉट .
मित्रांच्या गप्पा गोष्टी आणि प्लानिंग
सगळ तिथेच व्हायचं शनिवार
आणि रविवार म्हणजे तिथे मिळून
पार्टी हा ठरलेला कार्यक्रम.
तर झाल अस
कि त्या दिवशी माझा वाढदिवस
होता. आम्ही आमच्या कट्ट्यावर
बसून पार्टी करायचे ठरवले .
आम्ही सगळ्यांनी तेव्हा आमच
पिणार्यांच्या दुनियेत नवीन
पदार्पण होत म्हणजेच
आम्ही बिअर प्यायला नवीन
नवीन सुरवात केली होती.
आम्ही सगळे कट्ट्यावर
जमलो शनिवारचा तो दिवस
होता रात्रीचे ९ वाजून गेले
होते पण
शाळेचा तो कट्टा एका साईट
ला होता आणि समोरच मोठ वडाच
झाड होत त्यामुळे कट्ट्यावर
सहसा कोणी येत नसे एक दम
काळोख असायचा नेहमी तिथे .
मित्रांनी वाढदिवसाचा केक
सुधा आणला होता. केक
कापला आणि अंधाराचा फायदा घेत
आम्ही प्यायला सुरवात केली .
आम्ही मस्त जोक पास करत
होतो आणि स्वताच्या पिण्याच्या धुंदीत
मजा करत होतो. अचानक
वडाच्या झाडा मागून
आलेल्या एका विचित्र आवाजाने
सगळे स्तब्ध झाले .
कोणीतरी विचित्र आवाजात
उदगारले शुक शुक एकटे एकटे
केक खाल्लात ना .
आधी घाबरलो नंतर विचार
केला कि कोणी मित्रांनीच
झाडाच्या मागून आवाज
काढला असेल . म्हणून
आम्ही शिव्या दिल्या आणि बोललो कि चल
आता मूड खराब करू नकोस
पार्टी जॉईन कर . पण समोरून
काहीच उत्तर आल नाही.
आम्ही त्याकडे दुर्लक्ष केल
आणि परत प्यायला सुरवात केली.
रात्रीचे ११.३० वाजले असतील
आमची बिअर संपली होती . पण
माझा मित्र सादिक याला अजून
प्यायची होती . म्हणून
तो म्हणाला मी अतुल ला घेऊन
जातो तुम्ही इथेच
बसा आम्हाला पण थोडी किक
लागली होती आम्ही होकारार्थी मन
हलवल्या व ते दोघे निघून
गेले .
आम्ही दोघ आता बसून
गप्पा मारत होतो तेवढ्या परत
अचानक तोच आवाज शुक शुक
म्हणून आला पण
आता तो झाडाच्या मागून नव्हे
तर झाडा वरून आला म्हणून
आम्ही वर पहिले
आणि अंगाचा थरकाप उडाला . एक
विचित्र आकृती त्या झाडावर
बसली होती आणि आम्ही जसे वर
पहिले तशी त्या आकृतीने
त्या झाडावरून दुसरीकडे
उडी मारली आणि क्षणात अदृश्य
झाली .
आम्ही घाबरलो पण
प्यायलो असल्यामुळे
आम्ही ती आकृती जिथे अदृश्य
झाली तिथे पाहून
शिव्या द्यायला लागलो .
तेवढ्यात सादिक चा फोन
आला कि सगळे वाइन शॉप बंद
आहेत आमचा मूड खराब
झाला आम्ही त्याला बोललो कि तुम्ही घरी जा आम्ही पण
निघतो इथून . असा बोलून फोन
ठेवला .
रात्रीचे १२ वाजले होते
आम्ही निघत होतो तेवढ्यात
हेमंत जो माझ्या बरोबर
होता त्याला toilet ला झाली.
मी बोललो मग कर इथेच पण
तो बोलला शाळेच्या बाजूला आहे
न तिथे जावून
करूया त्याच्याशी वाद
घालण्यात पर्याय
नव्हता आम्ही दोघ त्या toilet
च्या दिशेने निघालो .
हेमंत ने toilet
चा दरवाजा ढकलला पण
तो उघडला नाही म्हणून त्याने
एक जोरात लाथ त्या दरवाजावर
मारली आणि दरवाजा थाड कान
उघडला आणि समोरच दृश्य पाहून
काळजाचा ठोका चुकला अंगातून
भीतीची एक लहर निघून
गेली त्या toilet मध्ये एक
पूर्ण पाने जळलेली बाई
आमच्या कडे पाहून वेड वाकड
हसत होती संपूर्ण जळालेल शरीर
मास सगळ लटकत होत डोळे पांढरे
होते आणि खूप वास मारत
होता जळलेल्या मासाचा आणि तीचे
हाथ आम्हाला पकडायला पुढे
येवू लागले तसे अंगात
जेव्हढी ताकद
होती तेवढी एकटवून आम्ही पळू
लागलो . ते थेट चौका पर्यंत .
तिथे आम्हाला सादिक आणि अतुल
दिसले
आमची सगळी नशा उतरली होती आम्ही घडलेला सगळ
प्रकार सांगितला हे ऐकून ते
सुधा शौक झाले . नंतर कळल
कि ती अमावस्येची रात्र
होती आणि तेव्हा आम्ही कट्ट्यावर
जाण बंद केल ………….
गोष्ट आवडली असेल तर
नक्की लाईक आणि कमेंट
करा आणि तुमच्या जवळ
अशा काही घटना असतील तर पेज
ला नक्की मेसेज करा