नमस्कार मित्रानो ,
आजची स्टोरी आपला मित्र संदीप कांगणे
यांनी सांगितली आहे . तो १४
वर्षाचा असताना त्याच्या सोबत
घडलेला हा अनुभव आहे. तो म्हणतो ,
मी मुळचा मुंबईचा माझ गाव चिपळूण मधील
गावठण इथे आहे . या घटनेला आता १० वर्ष
पूर्ण झाली असली तरी माझ्या मनात ती अजून
ताजी आणि तितकीच भयानक आहे. मला मे
महिन्याची सुट्टी पडली होती तेव्हा मी माझा भाऊ
आणि आई आम्ही गावाला गेलो होतो सुट्टीत .
मे महिना म्हटलं कि येते ती गावाची आठवण
आंबे , फणस , काजू, आणि इतर रसाळ
गोष्टी मनाला भुरळ पडतात. पण मला माहित
नव्हते
कि काही गोष्टी गावाला जेवढ्या चांगल्या आहेत
तेवढ्याच वाईट सुधा आहेत .
तर झाल अस कि गावाला आम्ही सगळी भावंड
एकत्र क्रिकेट खेळायचो , आंबे
पडायला जायचो , नदीवर
अंघोळीला जायचो असा आमचा दिनक्रम
असायचा. आम्ही सगळे सकाळी लवकर म्हणजेच
५ वाजता उठून गावाच्या रानात रात्री पडलेले
आंबे .वेचायालो जायचो.
एक दिवस झाल अस कि आम्ही ७ भावंड लवकर
उठलो कारण आंबे वेचायला जाण्याचा प्लान
आदल्या रात्रीच
बनला होता आणि आम्ही माबा पोळी बनवणार
होतो म्हणून आंबे सुधा जास्त लागणार होते .
आम्ही ३ टोपल्या घेऊन निघालो १० ते १५ मिनिट
चाललो आमच्या मोठ्या भावाने सांगितले
कि जास्त आंबे आपल्याला जमा करायचे आहेत .
एकत्र राहिलो तर उशीर होईल मग
गावातल्यानी गुर सोडली तर ती अर्धे आंबे
खाऊन टाकतील. आणि आपल्याला हवे तेव्हडे
आंबे नाही मिळणार आपण एक काम करूया ३
ग्रुप मध्ये जावूया सगळ्यांनी मान डोलावली .
त्याने ४ जणांना दुसरी कडे पाठवले
आणि आम्ही तीघ मी माझा भाऊ
आणि तो एकत्र डोंगराच्या दिशेने गेलो .
आमच्या हातात २ टोपल्या होत्या एक
छोट्या टेकडीच्या पायथ्याला मोठ आंब्याच झाड
दिसलं आम्ही सगळे धावत त्याच्या जवळ
गेलो भरपूर आंबे पडले होते आम्ही सगळे जण
पटापट वेचत होतो सकाळी लवकर गेलो असल्याने
पूर्ण उजाडलं नव्हत थोडा काळोखच होता .
आंब्याच्या झाडा समोरच एक लहान
टेकडी होती म्हणजे सहज चढता येईल
अशी आणि त्या टेकडी वर मला एक आंब्याच
झाड दिसलं मी दादा ला म्हटलं तुम्ही इथले
जमा करा मी वर जाऊन बघतो आंबे पडले आहेत
कि नाही तेव्हा दादा ने सांभाळून
जाण्याचा इशारा केला. मी हळू हळू वर
चढलो तस आंब्याच झाड दिसू लागल पण
अचानक
मला कोणाच्या तरी बोलण्याचा म्हण्यापेक्षा भांडण्याचा आवाज
आला आधी विचार केला माझी दुसरी भावंड
असतील जी दुसरी कडे गेली होती म्हणून मी काय
झाल असेल ते पाहायला वेगाने चढू
लागलो आणि जेव्हा मी त्या टोकावर
पोहचलो आणि जे पाहिलं त्याने
माझ्या शरीरातला जीवच निघून गेला .
समोरच्या आंब्याच्या झाडाला लागून एक
पडका गुरांचा वाडा होता. अचानक वाड्यातून एक
टकला माणूस भांडत बाहेर
आला जो दिसायला खूप विचित्र दिसत
होता त्याच शरीर पूर्ण पांढर होत कि ते
त्या थोड्याश्या अंधारातही साफ दिसत होत
त्याची नख खूप मोठी होती आणि सुळे
दातही तोंडाच्या बाहेर आले होते . तो मधेच
झाडा कडे बघून भांडत आणि मोठ्या मोठ्याने
हसत होता . तो कोणाशी भांडोतोय हे
पाहण्यासाठी जेव्हा मी वर पहिले तेव्हा पायात
थरकाप भरला आंब्याच्या झाडाला एक पूर्ण लाल
साडी घातलेली बी उलटी लटकत
होती आणि ती विक्षिप्त पणे हसत होती. तिचे
डोळे पांढरे होते आणि केस एवढे लांब कि ते
जमिनीला लागत होते .
मला जागेवरून हलतही येत नव्हता माझ्या भावाने
मला खालून पाहिलं त्याला कळल
कि काही तरी विचित्र घडल आहे म्हणून
मी असा कडक झालो आहे तो धावत वर
आला आणि त्याने माझा हाथ
खेचला आणि आम्ही घसरत टेकडी वरून
खाली आलो टोपली तिथेच
सोडली आणि जीवाच्या आकांताने पळू लागलो ते
थेट घरी
घरी आल्यावर आजोबाना झालेली हकीकत
सांगितली ते म्हणाले आज गेला आहात तिथे
पुन्हा अमावस्या पूर्णिमेला तिथे फिरकू
नका तो पांडू दादाचा वाडा आहे . १०
वर्षा पूर्वी त्याने आणि त्याच्या बायकोने तिथे
आत्महत्या केली होती आणि ती जागा झपाटलेली आहे .
तेव्हा पासून
कानाला खडा लावला कि सकाळी उठून आंबे
आणायला जायचं नाही .