देवकीनें नीट गुंडाळून एका टोपलीत घालून एका दुपट्यांत त्याच्या स्वाधीन केलें. वासुदेव काही विचार न करता तडक निघाला आणि जस जसा तो जाऊं लागला तस तसे एकेक दरवाजे उघडत गेले. पाहारेकऱ्याना गाढ झोप लागलेली होती. तो मथुरा नगरीच्या बाहेर निसटून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. पण अंधार म्हणजे मी म्हणत होता. वाटेचा अंदाज येत नव्हता. तरी तो मन घट्ट करून चालला होता. या सगळ्यात जन्माला आलेले ते मुल पुढे जाऊन सृष्टीचा पालनहार ठरेल.