प्रशांत अमरचे शब्द विसरू शकत नव्हता. सत्य हेच होते की जतीन असताना प्राचीच्या आयुष्यात प्रशांतला नेहमीच दुय्यम स्थान होते. आणि आणखी एक समस्या होती. प्राचीने त्याचे प्रपोजल कधीच स्वीकारले नव्हते. त्याला प्राचीचे प्रेम लाभेल, असा त्याला विश्वास वाटत होता.

जतीन आणि तिचे ब्रेकअप झाले आहे पण  मी फक्त मित्र आहे. ती मला खूप क्लोज आहे पण मग प्राची माझ्यावर प्रेम का नाही करू शकत?

रात्री उशिरापर्यंत प्राचीशी त्याचे व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरू होते. खोलीतले दिवे बंद करून प्रशांतने दरवाजा आतून बंद केला होता. त्याचे आई-वडीलही आता झोपी गेले.

प्राचीच्या खोलीत तिचे आई वडील जात नसत.ते दोघे बोलत असताना हळूहळू सगळं जग झोपी गेलं. चंद्रप्रकाश आता प्रखर झाला होता.  त्यामुळे आकाशात लुकलुकणारे तारे हळूहळू दिसेनासे झाले. पृथ्वी पण फिरायची थांबली आहे कि काय असे वाटत होते. तरीही या दोघांचे व्हॉट्सअॅप चालूच होते.

प्राची- "रात्र खूप झाली आहे, आता झोपूया."

प्रशांत- "झोपूया? आणखी कोण आहे तुझ्याबरोबर?”

प्राची- "तू घाणेरडा आहेस. (मग ती दोन क्षण थांबली आणि म्हणाली) तू आहेस माझ्याबरोबर...? आहेस ना?.”

प्रशांत- "हो आहे ना...मी गुदगुल्या करतोय."

प्राची- "कुठे?"

प्रशांत- "आधी तुझ्या मानेला.......मग खांद्यावर............., मग दंडावर.......... मग हातावर..............

मग बोटांन.............. आता तुझ्या बाजूला............. मग तुझ्या काखेत........ आता पोटात............. आणि आता......"

प्राची- "बस-बस. आता गुदगुल्या पुरे. बाबा जागे होतील."

प्रशांतने मनाला आवर घातला.

मग प्राचीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली - "यार, मला सिग्गी प्यावी वाटते आहे. एकदम तलफ आली आहे."

मग काय पडत्या फळाची आज्ञा! अर्ध्या तासाच्या आत प्रशांतने खिडकीतून उडी मारली चाळीची हद्द ओलांडली आणि प्राचीच्या बिल्डींगच्या भिंतीवरून उडी मारून तिच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीला लटकून पेटती सिगारेट तिच्या पुढे धरली. त्याला सिगारेट घेऊन आलेला पाहून प्राचीच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून तो पुन्हा तिच्या प्रेमात पडला.

मग प्राचीने सिगारेटचा एक झुरका घ्यायचा आणि  दुसरा प्रशांतने अशा प्रकारे पाच मिनिटात दोघांनी सिगारेट संपवली. पण ही प्रक्रिया अनंतकाळ चालू राहिली असती तर किती बरे झाले असते असे प्रशांतच्या मनात क्षणभर आले. प्राचीच्या तोंडात साधी सिगारेटच होती पण प्रशांतला तिचा उग्र दर्प किती छान असा स्वर्गीय सुगंध वाटत होता.

मग निघायची वेळ आल्यावर प्रशांतने डोळ्यात थोडंसं पाणी आणून प्राचीला विचारलं - "मी खरंच जाऊ का?"

"मग? रात्रभर असाच लटकून राहशील का? राहिलास तर तू सकाळपर्यंत एकदम उंच होशील."

"ओके, बाय!" असं म्हणत प्रशांतने एका हाताने खिडकी धरली आणि दुसरा हात प्राचीच्या दिशेने पुढे केला. प्राचीचा हात हातात येताच तिने त्याला घट्ट पकडले. तिच्या तळहातांची ऊब मनात साठवून ठेवत प्रशांत म्हणाला- " आय लव यू!"

प्राचीने हसून हात सोडला.  " आय लव यू टू माय फ़्रेंड!! आता जा नाहीतर पप्पा जागे होतील आणि गोंधळ होईल." असं म्हणत प्राचीने खिडकी बंद केली.

प्रशांत प्राचीच्या बिल्डींगची भिंत ओलांडत असताना त्याने मागे वळून पहिले. प्राची खिडकीतून अच्छा करेल अशी त्याची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.

पण हो नंतर तिचा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला  “थँक यु सो मच” आणि दुसऱ्या मेसेज मध्ये भरपूर बदाम आले होते.

आता मात्र प्रशांत पुरता गोंधळून गेला होता. खरंच खिडकीवर लटकून राहिला असता तरी इतकं लटकवून ठेवल्यासारखं त्याला वाटलं नसतं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel