वज्रगिरीचा राजा विक्रम सिंह ह्याला पद्ममुखी नांवाची एक मुलगी होती. ती फार सुंदर होती. म्हणून तिच्याशी लग्न करण्यासाठी दूर दूर देशांच्या राजकुमारांनी प्रयत्न केला. त्यांत रत्नगिरीच्या इंद्रवर्माला विक्रमसिंहाने पसंत केले. पद्ममुखीला हि तोच राजकुमार आवडला. संगपुरचा राजा कालकेतु याच्या मनातून सुद्धा पद्ममुखीशी लग्न करावयाचें होते. त्याच्या आईने त्याला सुचविलें की तू विक्रमसिंहाला जाऊन भेट, बहुतेक तो तुझे म्हणणे कबूल करील. आईच्या म्हणण्याप्रमाणे कालकेतु विक्रमसिंहाला भेटला. आपली इच्छा व्यक्त केली. परंतु विक्रमसिंहाने त्याला होकार दिला नाही. बिचारा उलट्या पावली परतला. तो परतल्यावर विक्रमसिंहाने इंद्रवर्माला बोलावून त्याच्याशी पद्ममुखीचे लग्न ठरविले. पद्म् मुखी बरोबर घडलेले प्रसंग या कथेत दिले आहेत.