कुंतीभोज वैरंत्य नगराचा राजा होता. त्याला दोन बहिणी होत्या. एकीचे नांव सुदर्शना होते. ती काशी राजाची राणी होती. दुसरी सुचेतना. तिला सौवीर राजाला दिले होते. सुदर्शनाला वाटले की आपल्याला एक फार तेजस्वी पुत्र व्हावा. म्हणून तिनें कुन्ती प्रमाणेच मंत्रोच्चाराने अग्नीदेवाचा साक्षात्कार करून घेतला. त्याच्या कृपेने तिला पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचे आयुष्य आणि त्याची जडणघडण यात दिली आहे.