हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
(पावसाची नक्षत्रे दहा, त्या पैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पुर्वा, उत्तरा मग हस्त यायचं )
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं ।।
भोपळ्याच फुल बाई फुलरंजना
माळ्याचा माळ बाई माळरंजना
माळ्याची सांडली भिकबाळी
हुड्कुन दे पण हुड्केना
हुडकली पण सापडेना
शि़क्यावरच लोणी वाहात जा
ताट वाटी झळकत जा
ताट वाटी झळकली
पंगतीत जावून बसली
सर्प म्हणे मी एकुला
दारी आंबा पिकुला
दारी आंब्याची फोड ग
खिरापतीला काय ग ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.