रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सलग सुरूच आहे. रशियाने केलेल्या या आक्रमणानंतर युक्रेनमधील परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे.
जगातील महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस यांनी ५०० वर्षांपूर्वी २०२२ या वर्षीची एक मोठी भविष्यवाणी करून ठेवली आहे. नॉस्ट्राडेमस याने केलेली भविष्यवाणी या आधी कधीच चुकीची ठरलेली नाही. हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती याविषयी नॉस्ट्रॅडॅमसने केलेले अचूक भाकीत खरे ठरले आहे.
नॉस्ट्राडेमसचा जन्म १४ डिसेंबर १५०३ रोजी जर्मनीमध्ये झाला आणि २ जुलै १५६६ रोजी त्याचा मृत्यू झाला. या लेखात रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाबद्दल नॉस्ट्रॅडॅमसने काय भाकीत केले ते आम्ही तुम्हाला सांगतो.
इ.स. १५०० मध्ये नॉस्ट्रॅडॅमस याने आपल्या ‘द प्रोफेसीज ऑफ नॉस्ट्रॅडॅमस’ या पुस्तकात रशिया आणि युक्रेन युद्धाची भविष्यवाणी केली होती. नॉस्ट्रॅडॅमसने रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल जी गोष्ट लिहिली ती आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते.
त्यांनी लिहिले की, 'युरोपचा एक देश आपल्या सामर्थ्याने संपूर्ण जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी तो आपल्या सीमेला लागून असलेल्या दुसर्या छोट्या देशाशी लढेल. या युद्धात हजारो लोक मारले जातील आणि अनेक लोकांना आपली घरे सोडून इतर देशांमध्ये पळून जावे लागेल.
नॉस्ट्रॅडॅमसने पुढे लिहिले की, 'मोठ्या देशाचा शासक आपला पराभव पाहून अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करेल, परंतु लाखो लोकांचा मृत्यू आणि तिसरे महायुद्ध या भीतीमुळे तो जमिनीवर लढत राहण्याचा निर्णय घेईल. आणि अखेर तो त्या छोट्या देशावर विजय मिळवेल.
कोरोना व्हायरसबद्दल देखील नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी बऱ्याच अंशी खरी ठरताना दिसत आहे.नॉस्ट्रॅडॅमसने ५०० वर्षांपूर्वी जगाला करोना व्हायरसबद्दल इशारा दिला होता. नॉस्ट्राडेमसने लिहिले की, '२१ व्या शतकात जगा अशा एका भयंकर आजाराने पछाडले जाईल ज्यामुळे लाखो करोडो लोकांचा मृत्यू होईल'. त्याने पुढे लिहिले आहे कि 'हा प्राणघातक आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरेल आणि संपूर्ण जगाला त्याचा फटका बसेल. २०२४ मध्ये ही महामारी पूर्णपणे नष्ट होईल, तोपर्यंत माणसाला या भयंकर आजारापासून दूर राहावे लागेल.
काही तज्ञांच्या मते कोरोना व्हायरस हे तिसऱ्या महायुद्धासाठी तयार करण्यात आलेले जैविक हत्यार आहे.वरवर पाहता आपल्याला महामारी वाटणारा कोरोना तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नसेल? तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा.