सैनिक आम्ही, आम्हां लाभले बलशाली बाहू
युद्धाच्या वेदीवर आमुचे प्राण पणा लावू
भारतभूच्या सीमेवरती शत्रू येता कुणी
चिरडून टाकू स्वप्ने आम्ही त्यांची डोळ्यांतुनी
या भूमीची मुठभरसुद्धा माती नच देऊ
हिमालच्याच्या कुशीत वसले कारगिल नि द्रास
कश्मिरातल्या फुलाफुलांतुन भारतभूचा वास
परकीयांच्या घुसखोरीला सामोरे जाऊ
रणनीतीच्या सामर्थ्याचा आमुचा देश महान
या देशास्तव देऊ आम्ही श्वासाचे बलिदान
पराक्रमाची गाथा आमुची, यशोमयी होऊ
सैनिका आम्ही, आम्हां लाभले बलशाली बाहू
युद्धाच्या वेदीवर आमुचे प्राण पणा लावू !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.