उत्क्रांतीचा आज आम्हांला
देई नव संदेश
आमुचा महाराष्ट्र हा देश ॥
थोर आमुची मायमराठी
प्रेम देतसे सकलांसाठी
संतजनांच्या घेण्या भेटी
इथे येई परमेश
आमुचा महाराष्ट्र हा देश ॥
’जातपात’ हा विचार सोडुन
समानतेचा धागा जोडुन
मानवतेचा सदा आम्हांला
नित्य देई संदेश
आमुचा महाराष्ट्र हा देश ॥
कृतिशीलता इथले भूषण
नकोच आता केवळ भाषण
परस्परांचे नकोच शोषण
करी असा उपदेश
आमुचा महाराष्ट्र हा देश ॥
इथली व्यक्ती, इथले नायक
सत्य-शिवाचे व्हावे पाईक
श्रम-शौर्याची शर्थ कराया
मनास दे आवेश
आमुचा महाराष्ट्र हा देश ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.