सताड उघडा खिडक्या-दारे, मधल्या भिंती पाडा रे,

शांतीच्या कळसावर चढवा माणुसकीचा झेंडा रे

कुणी न हिंदू, कुणी न मुस्लिम

कुणी शीख ना कुणी इसाई,

प्रेमधर्म हा धर्म आपुला

नाते अपुले भाई भाई

हृदयामधल्या देवासाठी मने मनांशी जोडा रे -

या मातीची जात कोणती

आकाशाचा धर्म कोणता ?

वर्ण कोणता या पाण्याचा

या वार्‍याचा पंथ कोणता ?

एकी, शांती तिथेच प्रगती, चला विषमता गाडा रे -

अफाट धरणी, अथांग सागर

आकाशाचे असीम छप्पर,

शिरी हिमालय, हृदयी गंगा

उभे चराचर हे अपुले घर

विज्ञानाचे पंख हवे की अज्ञानाचा गाडा रे -

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel