दया गाणारे हात

प्रभो, मज दया गाणारे हात

नको राजसिंहासन लक्ष्मी नको स्वर्ग साक्षात

प्रभो, मज दया गाणारे हात

शेतमळ्यांतुनि रोज राबती

मातीमधुनी मोती पिकविति

सोशिक कणखर शेतकर्‍यांचे श्रावण-श्यामल हात

प्रभो, मज दया गाणारे हात

विणीत स्वप्‍ने बोटे फिरती

ज्यांची जात्यां-चात्यांवरती

त्या श्रमिकांचे चपल सफल दया आशासुंदर हात

प्रभो, मज दया गाणारे हात

त्या हाताला विचार फुटतिल

अन् गाण्याचे सूर उगवतिल

आज-उदयाची गातिल गाणी धडपडणारे हात

प्रभो, मज दया गाणारे हात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel