पावसा रे, थांब कसा !

बंद दारे, बंद सारे

कोंडून मी राहू कसा ?

परसात जाऊ कसा ?

जास्वंदीचे लाल फूल

हात त्याला लावू कसा ?

अंगणात जाऊ कसा ?

कागदाच्या होडया छान

पाण्यापाशी नेऊ कसा ?

शाळेमधे जाऊ कसा ?

धडा माझा तोंडपाठ !

दहापैकी दहा घेऊ कसा ?

मैदानात जाऊ कसा ?

चेंडूफळी कोपर्‍यात

मुकाटयाने पाहू कसा ?

-बाबा आले ! थांब कसा !

ठोक देतील रागाने

रडशील ढसा ढसा !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel