झुक्झुक् आली नभी
ढगांची रेल
ढगांची रेल तिला
डबे रेलचेल
डब्याडब्यांत भरलेली
पावसाची पोती
रेल अशी भरधाव
नभी जात होती
घाबरुन सूर्याने
मारली कुठे दडी
वारादादा सैरावैरा
त्याची वळे बोबडी
ढगांची रेल अशी
दिमाखाने निघे
डोंगराचा माथा तिला
हसून हसून बघे
धावताना भरधाव
ढगांची रेल
आदळली डोंगरावर
संपलाच खेळ
पावसाची फुटली पोती
कोसळता रेल
भयाने थरथरे
विजेची वेल
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.