नदीबाई माय माझी

डोंगरात घर

लेकरांच्या मायेपोटी

येते भूमीवर ॥

नदीबाई आई माझी

निळे निळे पाणी

मंद लहरीत गाते

ममतेची गाणी ॥

नदीमाय जळ सार्‍या

तान्हेल्यांना देई

कोणी असो कसा असो

भेदभाव नाही ॥

शेतमळे मायेमुळे

येती बहरास

थाळीमध्ये माझ्या भाजी-

भाकरीचा घास ॥

श्रावणात आषाढात

येतो तिला पूर

पुढच्यांच्या भल्यासाठी

जाई दूर दूर ॥

माय सांगे, थांबू नका

पुढे पुढे चला ॥

थांबत्याला पराजय

चालत्याला जय ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel