नदी वाहते त्या तालावर

शेते काठावरती झुलती

ऊन-पावसा झेलत झेलत

कणसांमध्ये भरती मोती

नदी वाहते त्या तालावर

झाडे सरसर उंच वाढती

फळाफुलांना बहर अनावर

फांदयांवर पक्ष्यांची घरटी

नदी वाहते त्या तालावर

पाऊलवाटा पळती, वळती

सगेसोयरे येता-जाता

सुखदुःखाला येई भरती

नदी वाहते त्या तालावर

मंदिरातले दीप तेवती

वेशीवरती जागृत दैवत

लोक सुखाने झोपी जाती

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel