माझ्या ग अंगणात

थवे फुलपाखरांचे

गोल गोल रिंगणात

गाणे फिरते रंगांचे

माझ्या ग अंगणात

पंख फिरकती तयांचे

लाल-गुलाबी फुलांत

ध्यान चालले निळ्याचे

माझ्या ग अंगणात

वेल निळे गोकर्णीचे

गर्द पोपटी पानांत

झुले झुंबर पंखांचे

माझ्या ग अंगणात

मिटे पंख पाखरांचे

हळू जाता धरु हात

पंख फाटती त्यांचे

अशा माझ्या अंगणात

रंग सांडले फुलांचे

फुलपंखी मंडपात

रंग थवे पाखरांचे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel