आकाशअंगणी

रंग उधळुनी

चित्र रेखिले

कबुतरांनी -

- आकाशअंगणी

फेर धरुनी

चंद्राभवती

चांदण्यांनी

अवतीभवती

-आकाशअंगणी

आकाशअंगणी

सुबक काढली

ढगाढगांनी

रंग रांगोळी

- आकाशअंगणी

आकाशअंगणी

रंगी रंगुनी

दंग जाहले

मोर-मोरणी

- आकाशअंगणी

आकाशअंगणी

ढगाढगांतून

सिंह, उंट अन्

ससे खेळती

आकाशअंगणी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel