अर्धाच का ग दिवस
आणि अर्धी रात्र असते,
सारखं सारखं विचारलं, की
आई हळूच हसते.
दिवसा असतो उजेड
आणि काळोख कसा रात्री
माझ्यासारखी शूर मुलं
होतात कशी भित्री ?
सूर्य मोठ्ठा दिवसभर
फिरतो गरगर आकाशात
दिसेनासा होतो कसा
चांदण्याच्या प्रकाशात ?
दिवसभर उघडे डोळे
रात्री पापण्याच मिटतात
आपोआपच झोपतात सगळे
कसे सकाळीच उठतात ?
घरामधल्या कुणालाच
उत्तर येत नाही
शाळेमधेच खरं कळेल
हुश्शार फक्त बाई !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.