लालपिवळा लालपिवळा,
म्हणजे झाले फूल छान.
निखळ हिरवा हिरवा, म्हणजे
झाले एक सुरेख पान.
निळाजांभळा, निळाजांभळा,
म्हणजे-दुरुन डोंगर पहा !
लालसर निळा, तांबुस जांभळा,
म्हणजे झाला ढग, अहा !
जांभळा, हिरवा, म्हणजे-मोर,
लालसर केशरी, म्हणजे-आंबा.
कुंकवासारखा एक ठिपका,
म्हणजे, सूर्य-आणखी थांबा -
तांबडा, जांभळा, निळा, पिवळा,
पोपटी, हिरवा, संगसंग -
म्हणजे झाले आकाशातले
इंद्रधनुष्य सप्‍तरंग !
इतके रंग, आणखीसुद्‌धा -
असतील तेवढे करा गोळा
जगातले सगळे सगळे रंग,
म्हणजे - माझा फक्‍त डोळा !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel