करा रे हाकारा पिटा रे डांगोरा
खेळाया चक्कर भवरा
ओसाड माळात चिंचेच्या खालती
सोडावा शीतल वारा
नदीच्या तासात वाळूच्या जोसात
खणावा खोल झरा
कहार उन्हात कामाला उपसीत
आळवावा सारंगधरा
हासर्या नजरेनं खुशीच्या बोलीनं
फुलवाव्या येरझारा
गर्जू दे नभाला नाचू दे विजेला
सोडीत अमृतधारा
करा रे हाकारा पिटा रे डांगोरा
खेळाया चक्कर भवरा
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.