उन्हामध्ये पावसाला रुपडं येतं
डोळे भरुन पहावं, तर डोळ्यांत उतरतं.
उन्हामध्ये पावसाची झुलते वेली
वेलीच्या दंडावर सोन्याची पाकोळी.
पाकोळीमागं भिरभिरतात डोळे
सळसळत्या धारांचे सोनेरी जाळे.
जाळ्यामध्ये कुणाची गवसली मासोळी
उन्हाची, पावसाची, डोळ्यांतली बाहुली ?
धारांनी उन्हाला जाळ्यामध्ये ओढलं
पावसाचं बोट उन्हानं धरलं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.